एक्स्प्लोर

IAS Pooja Khedkar Update : पूजा खेडकरला फायनल नोटीस, 2 ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करा अन्यथा... कार्मिक विभागाचा निर्वाणीचा इशारा

IAS Pooja Khedkar Update : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरला कार्मिक विभागाने नोटीस बजावली आहे. 2 ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश पूजा खेडकरला दिले आहेत.

IAS Pooja Khedkar Update : राज्यासह देशभरात चर्चेत आलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या (IAS Pooja Khedkar) अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरला कार्मिक विभागाने नोटीस बजावली आहे. 2 ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश पूजा खेडकरला दिले आहेत. जर 2 ऑगस्टपर्यंत उत्तर आले नाही तर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) मसूरीतील प्रशिक्षण केंद्रात चौकशासाठी हजर झाली नव्हती. पुणे पोलिसांसमोर देखील चौकशीसाठी तीन नोटीसा देऊन देखील ती अनुपस्थित राहिली होती. खेडकरला मसूरीत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. यापूर्वी कार्मिक विभागाने स्थापन केलेल्या समितीने खेडकरवर (IAS Pooja Khedkar) गंभीर प्रश्न उपस्थित करणारा अहवाल सादर केला आहे. त्यानंतर पुढील कारवाईपूर्वी खेडकरची बाजू ऐकली जावी म्हणून नोटीस जारी करण्यात आली आहे.

IAS पूजा खेडकर प्रकरणातील डॉक्टरांचा सुधारित चौकशी अहवाल तयार

एबीपी माझाने वादग्रस्त IAS पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) आणि वायसीएम रुग्णालयाची पोलखोल केली होती. त्यानंतरचा सुधारित चौकशी अहवाल अधिष्ठाता डॉक्टर राजेश वाबळेंनी तयार केलेला आहे. तो आज पिंपरी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंहांना सुपूर्त केला जाईल. शिकाऊ डॉक्टरने तपासणी कशी काय केली? फिजिओथेरपी विभागाने डाव्या गुडघ्यात इजा आढळली नाही, असं म्हटलं असताना कोणत्या आधारावर अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले? असे प्रश्न एबीपी माझाच्या हाती लागलेल्या कागदपत्रांमुळं उपस्थित झाले होते. 

त्यानंतर पालिका आयुक्तांनी स्वतः चौकशीसाठी संबंधित सर्वांना बोलवून घेतलं होतं. डॉक्टर वाबळेंचा पहिला अहवाल फेटाळला त्यानंतर त्यांनी सुधारित अहवाल बनवण्याचे आदेश दिले होते. तोच सुधारित अहवाल आज पालिका आयुक्तांकडे पोहचणार आहे. मात्र आता यात कोणाला दोषी धरण्यात आलं आहे की डॉक्टर वाबळेंनी वायसीएमला क्लीनचिट देण्याचा प्रयत्न केला? हे आज समोर येणार आहे.

पुणे पोलिसांच्या नोटीस धुडकावली; मसुरीला गैरहजेर, पूजा खेडकर गेली कुठे?

पूजा खेडकर (Pooja Khedkar) गेल्या काही दिवसांपासून गायब आहे. पूजा खेडकर (Pooja Khedkar)  कूठे आहे हा प्रश्न आता वेगवेगळ्या तपास यंत्रणांना पडला आहे. यू.पी.एस.सीने प्रशिक्षण थांबल्यानंतर पूजा खेडकर (Pooja Khedkar) वाशीम मधून निघाल्यावर कुठे गेली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिल्ली पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, खरा पण ती अद्याप दिल्ली पोलिसांना भेटलेली नाही. पुणे पोलिसांनी तीनवेळा नोटीस बजावून देखील ती पुणे पोलिसांसमोर हजर झालेली नाही यू.पी.एस.सीने तिला मसुरी इथल्या प्रशिक्षण केंद्रात बोलावल्यानंतर ती मसुरीला प्रशिक्षण केंद्रात गेली की नाही हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे पुणे पोलिसांनी पूजा खेडकर (Pooja Khedkar) आई वडीलांचा घटस्फोट खरंच झाला होता का याबाबत तपास करुन त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Jalgaon | जळगाव अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 5 लाखाची मदतABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra NewsJalgaon Railway Accident | जळगावात भीषण अपघात, अनेक जणांनी गमावला जीव ABP MajhaPushpak Express Accident : अपघात नेमका कसा झाला? पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांची EXCLUSIVE माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
Embed widget