एक्स्प्लोर
...तोपर्यंत मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही : पंकजा मुंडे
नांदेड जिल्ह्यातील माळेगाव इथल्या खंडोबाची यात्रेत आयोजित धनगर आरक्षण जागर परिषदेत पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं.
नांदेड : "धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत परत मंत्रालयात आम्ही प्रवेश करु शकणार नाही," असं जाहीर वचन राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाला दिलं. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव इथल्या खंडोबाची यात्रेत आयोजित धनगर आरक्षण जागर परिषदेत पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं.
या परिषदेला रासपचे प्रमुख महादेव जानकरही उपस्थित होते. "मी पंकजा गोपीनाथ मुंडेंची कन्या, पंकजा मुंडे, आजच्या सभेत तुम्हाला जाहीर वचन देते की, धनगर समाजाच्या विश्वासाच्या जीवावर परत सत्तापरिवर्तन न करता, सत्तेमध्ये भारतीय जनता पक्षाला आणायचं आहे," असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पण धनगर आरक्षण मिळाल्याशिवाय परत मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही, याचा विश्वास असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं.
धनगर आरक्षणासाठी दिल्लीच नव्हे तर पृथ्वीच्या बाहेर जाण्याची, तुमच्यासोबत मेंढरामागे येण्याची तयारी असल्याचा विश्वास पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाला दिला. "धनगर आरक्षणात कोणी आडकाढी आणली तर ही काढी उगारायला मागे-पुढे बघणार नाही," असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
शेत-शिवार
भविष्य
Advertisement