एक्स्प्लोर

हे सरकार गाडण्यासाठी मी अण्णांसोबत आहे : राज ठाकरे

सरकारने लोकपाल नियुक्ती करावी या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसले आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णांची भेट घेतली.

अहमदनगर : सरकारने लोकपाल नियुक्ती करावी या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसले आहेत. आज अण्णांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णांची भेट घेतली. अण्णांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावेळी राज म्हणाले की, "हे सरकार गाडण्यासाठी मी अण्णांसोबत आहे." अण्णांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे म्हणाले की, "हे मोदी सरकार निर्ढावलेले आहे, निर्दयी आहे. पंतप्रधानांनी अण्णांना उपोषणासाठी शुभेच्छा पाठवणे हा तर निर्लज्जपणा आहे. अण्णा हजारे जगले काय आणि मेले काय याचा सरकारला काहीही फरक पडत नाही." दिल्लीचे मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांचे जुने सहकारी अरविंद केजरीवाल यांच्यावरही राज यांनी टीका केली आहे. राज म्हणाले की, "अण्णांमुळे केजरीवाल जगाला माहीत झाले. अण्णांचा वापर करुन केजरीवाल मोठे झाले. त्यामुळे केजरीवाल यांनी आतापर्यंत अण्णांना भेटायला यायला हवं होतं, परंतु ते अण्णांना भेटायला येत नाहीत." सहा दिवसांपासून अण्णा हजारे उपोषणाला बसले आहेत. परंतु अद्याप सरकारकडून अण्णांच्या मागणीचा कोणत्याही प्रकरचा विचार झालेला नाही. त्यामुळे 8 किंवा 9 तारखेपर्यंत सरकारने लोकपाल नियुक्तीबाबत निर्णय घेतला नाही तर पद्मभूषण पुरस्कार परत करणार, असा निर्वाणीचा इशारादेखील अण्णा हजारे यांनी सरकारला दिला आहे. कायदा होऊन 5 वर्षे झाली तरी सरकार लोकपाल नेमायला तयार नाही. लोकपालची नियुक्ती होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका अण्णांनी घेतली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget