एक्स्प्लोर
जप करुन मी रुग्णांना बरं करतो, मात्र प्रमोद महाजनांच्याबाबतीत मी फेल झालो, चंद्रकात खैरेंचा अजब दावा
खैरे राज्य सरकार आयोजित आरोग्य मेळाव्यात बोलत होते. एवढंच नव्हे तर भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांना रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष भेटता न आल्याने मी जीवनात एकदाच अयशस्वी झालो, असं ते म्हणाले.
औरंगाबाद : मी रुग्णाची नाडी धरून जप केला तर रुग्ण बरे होतात, असा अजब दावा शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. खैरे राज्य सरकार आयोजित आरोग्य मेळाव्यात बोलत होते. एवढंच नव्हे तर भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांना रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष भेटता न आल्याने मी जीवनात एकदाच अयशस्वी झालो, असं ते म्हणाले.
या कार्यक्रमात चंद्रकात खैरे यांनी त्यांच्या भाषणात रुग्णांना आरोग्याबाबत अनेक उपदेश दिले. माझ्याकडे डॉक्टरची डिग्री नाही. मात्र मी अनेक लोकांना बरे केले आहे. मी नाडीला हात लावून जप केला तर संध्याकाळपर्यंत मृत्यू होईलअसे डॉक्टरांनी घोषित केलेले रुग्णही बरे होतात, असा दावा खैरे यांनी केला आहे.
प्रमोद महाजन रुग्णालयात असताना मला भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी काही तरी करा, असं म्हटलं होतं. मग मी त्यांना एक पुडी प्रमोद महाजन यांच्या उशी खाली ठेवायला सांगितली होती, असंही खैरे म्हणाले आहे. बारा दिवस ते जिवंत होते. परंतू आतमध्ये कोणालाही प्रवेश नव्हता म्हणून पुडीला हात लावून जप झाला नाही. त्यामुळे मी जीवनात पहिल्यांदाच फेल झालो. मी कधी फेल होतं असं ते म्हणाले. शिवाय हे अंधश्रद्धा नाही हे सांगायलादेखील ते विसरले नाही.
घाटी रुग्णालयातील रुग्णांना खैरेंनी बरं करुन दाखवावं - हमीद दाभोळकर
लोकप्रतिनिधींनी अशा स्वरुपाचा दावा करणं खूप चुकीचं आहे. महाराष्ट्रात जादुटोणा विरोधी कायदा आहे. कुठलाही दैवी चमत्काराचा दावा करुन लोकांची दिशाभूल करणं हा गुन्हा आहे. त्यामुळे प्रतिनिधी जरी असले तरी पोलिसांनी त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलनचे हमीद दाभोळकर यांनी केली आहे. प्रबोधन ठाकरेंच्या विचारांचा वारसा शिवसेना सांगते. प्रबोधन ठाकरे यांनी आयुष्यभर अंधश्रद्धेचा विरोध केला होता. मात्र शिवसेनेचेच लोकनियुक्त खासदार अंधश्रद्धा पसरवत आहेत. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात शेकडो रुग्ण येतात त्यांना खैरेंनी बरं करुन दाखवावं, असं आव्हान हमीद दाभोळकर यांनी खैरेंना केले आहे.
VIDEO | जप करुन मी रुग्णांना बरं करतो, चंद्रकात खैरेंचा अजब दावा | औरंगाबाद | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
कोल्हापूर
Advertisement