एक्स्प्लोर
पैशांसाठी सासरच्यांकडून गर्भवतीचा गळा आवळून खून

लातूर : लातूरमधील नदीहत्तरग्यात पैशांसाठी गर्भवतीची हत्या करण्यात आली. महिलेच्या सासरच्या मंडळींनी तिचा गळा आवळून खून केला. वर्षा लक्ष्मण फुलसुरे (वय 22 वर्ष) असं मृत गर्भवती महिलेचं नाव आहे. वर्षा फुलसुरे यांचं एक वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. सासरच्या मंडळींनी पैशांसाठी तिच्याकडे तगादा लावला होता. माहेरच्या लोकांनी लग्नात काही दिलं नाही, असं म्हणत तिचा छळ करत असत. इतकंच नाही तर गरम तव्यावर दोन्ही हात ठेवून तिच्यावर अत्याचार केले. कासार शिरसी पोलिस ठाण्यात गुन्हा सासू, सासरे आणि पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षा फुलसुरे यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारल्याच्या खुणा असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























