एक्स्प्लोर
बारावी रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतील चुकांचे 7 गुण मिळणार?
बारावी रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये चार प्रश्नांत छपाईच्या चुका होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना सात गुण देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
मुंबई : बारावी रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत चार चुका असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सात गुण खैरात होण्याची शक्यता आहे.
बारावीच्या रसायनशास्त्राची 28 फेब्रुवारीला परीक्षा होती. त्यामध्ये चार प्रश्नांत छपाईच्या चुका होत्या. या चुकांमुळे विद्यार्थ्यांना सात गुण द्यावे लागणार आहेत. मुख्य नियंत्रकांनी घेतलेल्या बैठकीत ही शिफारस करण्यात आली.
काय होते प्रश्न?
प्रश्न 2. (2) - 'त्याचे दोन उपयोग द्या' ऐवजी 'दोन उपयोग द्या' (2 गुण)
प्रश्न 3. (4) - 'अंतर्गत ऊर्जेतील बदल मोजा' ऐवजी 'अंतर्गत ऊर्जा मोजा' (2 गुण)
प्रश्न 6. (4) - अभ्यासक्रमाबाहेरील रासायनिक समीकरण (2 गुण)
प्रश्न 8. (ब) - चुकीच्या पद्धतीने आयसोसायनाईडच्या समीकरणाबाबत प्रश्न (1 गुण)
ज्या विद्यार्थ्यांनी केवळ प्रश्न क्रमांक लिहिला आणि उत्तराची जागा मोकळी सोडली, त्यांनाही बोनस गुणांचा लाभ होणार आहे. राज्य बोर्डाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी मात्र अद्याप कोणतीही शिफारस मिळाली नसल्याचं सांगितलं.
बारावीची प्रश्नपत्रिका तज्ज्ञांकडून तयार केली जाते, मग या प्रश्नपत्रिकेत इतक्या चुका कशा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या चुकांसाठी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून केली जात आहे. बारावीच्या परीक्षेतील चुकांमुळे पुन्हा एकदा बोर्डाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement