एक्स्प्लोर

धक्कादायक! 12 वीला कमी गुण, विद्यार्थ्याने संपवले जीवन; नीटचा पेपर अवघड गेल्यानेही टोकाचं पाऊल

काल झालेल्या नीट परीक्षेचा पेपर बरोबर न गेल्याने नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना यवतमाळच्या दिग्रस येथे घडली

जळगाव : राज्यात इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेचा (HSC results) निकाल आज जाहीर झाला. यंदाही मुलींनेच बाजी मारली असून 98 टक्के निकालासह विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. पेढे वाटून, केक कापून आणि कुटुंबीयांसोबत गोडधोड आठवणी जपत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपला आनंद साजरा केला. सोशल मीडियातूनही 12 वीच्या परीक्षेच्या निकालासंदर्भाने जनजागृती केली जात आहे. विद्यार्थ्यांनी अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्यास खचू नये, पुन्हा जोमाने तयारी करावी किंवा आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे असा संदेश दिला जात आहे. मात्र, 12 वीच्या बोर्ड परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची घटना जळगावमध्ये (Jalgaon) घडली आहे. तर, यवतमाळमध्येही नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याने जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज लागला. या निकालात अपेक्षेपेक्षा मार्क कमी मिळाल्याने जळगाव जिल्ह्यातील ममूराबाद गावातील ऋषिकेश दिनेशचंद्र पाटील या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे यवतमाळमध्ये नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं. 

काल झालेल्या नीट परीक्षेचा पेपर बरोबर न गेल्याने नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना यवतमाळच्या दिग्रस येथे घडली. लकी सुनील चव्हाण (19) असं आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव. पेपर कठीण असल्याने आपण अपेक्षित निकाल देऊ शकत नसल्याच्या भीतीने ही आत्महत्या केली आहे. मृत लकी चव्हाण याने नांदेड येथे कोचिंग क्लासेस करून नीट परीक्षेची तयारी केली होती. मृत लकी चव्हाण यांचे काका मंगल चव्हाण यांनी, काल झालेल्या पेपर ठीक न गेल्याने तो नाराज होता,असे दिग्रस पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. लकीचे वडील सुनिल नुरसिंग चव्हाण शिक्षक असून फुलउमरी ता. मनोरा जिल्हा वाशिम येथे कार्यरत आहे. नीटचा पेपर दिला होता. मात्र,पेपर चांगला गेला नसल्याने व आपण नापास होऊ व आई वडीलांच्या अपेक्षा पूर्ण करु शकणार नाही,या भितीने पहाटे तीन वाजताच्या सुमारास  महेश नगर दिग्रस येथे आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

वैभवी देशमुखला 12 वीत 85 टक्के, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैभवी देशमुख हिचे फोनवरून अभिनंदन केले. यावेळी पुढे काय करायचे आहे असे एकनाथ शिंदे यांनी वैभवीला विचारले. तर, धनंजय देशमुख देखील यावेळी बाजूला उपस्थित होते. वैभवीला चांगले मार्क पडले आहेत म्हणून मी फोन केला, पुढे काय करणार आहे याची विचारणा केली. तिला पुढे काय शिकायचे आहे? असा प्रश्नही उपमुख्यमंत्र्यांनी विचारला. त्यावर, पुढच्या एक-दोन दिवसात आम्ही बोलून ठरवणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी शिंदे यांना सांगितले.

हेही वाचा

मोठी बातमी! राहुल गांधी मोदींच्या भेटीला, सरन्यायाधीशही हजर; सीमारेषेवर तणाव, दिल्लीत बैठकांची धाव

महत्त्वाच्या बातम्या

BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget