एक्स्प्लोर

How to get Maratha-Kunbi caste certificate: मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरु, मराठवाड्यात धडाका; नवं प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया काय?, A टू Z माहिती

How to get Maratha-Kunbi caste certificate: लातूर, धाराशिव, हिंगोलीमध्ये आज मराठा-कुणबी जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. नवं प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया काय?, A टू Z माहिती

How to get Maratha-Kunbi caste certificate: कुणबी नोंदी आढळलेल्या लातुरातील दोन जणांना आज कुणबी प्रमाणपत्र (Maratha Kunbi caste certificates) मिळाले आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त लातूर शहरातील हुतात्मा स्मारक येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान, या दोघांना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. राज्य शासनाने नुकत्याच काढलेल्या नवीन जीआर नुसार हे प्रमाणपत्र या दोघांना मिळाल्याची माहिती प्रशासनाने दिली. कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रमाणपत्रधारकांनी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे आभार मानले. तसेच हे प्रमाणपत्र मुलांच्या पुढील शिक्षणादरम्यान उपयोगात येणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

धाराशिवमध्येही कुणबी प्रमाणपत्राचे वाटप-

धाराशिवमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्यसाधून कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. मराठवाड्यात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झाले. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते चार कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. मुंडे अभिषेक व्यंकटेश, धाराशिव, प्रगती व्यंकटेश मुंडे, पूजा व्यंकटेश मुंडे, गणेश व्यंकटेश मुंडे सर्व राहणार धाराशिव यांना आज कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले.

हिंगोलीमध्येही 50 मराठा बांधवांना कुणबी जातीच्या प्रमाणपत्राचे वाटप-

हिंगोली जिल्ह्यातील पन्नास मराठा समाज बांधवांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते जिल्ह्यातील नागरिकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र आज देण्यात आले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं, यासाठी आज राज्य शासनाच्यावतीने कुणबी जातीची प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे? आणि अर्जाची प्रक्रिया कशी असेल? (How to get Maratha-Kunbi caste certificate?)

जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अर्जदाराने जात प्रमाणपत्रासाठी अर्ज थेट उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे करावा. त्यानंतर अर्जाची पडताळणी स्थानिक समितीकडे पाठवली जाईल. या समितीकडून वंशावळ तपासणी केली जाईल. त्याचबरोबर जुन्या नोंदी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला, वाडवडिलांच्या नोंदी यांसारखे कागदपत्र तपासले जातील. चौकशीचा अहवाल मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रमाणपत्र देण्याचा अंतिम निर्णय घेतील. यासाठी शासनाने समिती सदस्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रशिक्षणामध्ये जात प्रमाणपत्राच्या नियमावली, चौकशीची पद्धत, अहवाल तयार करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया (Process for obtaining Maratha-Kunbi caste certificate)

1) मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे अर्ज करावा. 

२) उपविभागीय अधिकारी या अर्जाची पडताळणी स्थानिक समितीकडे पाठवेल 

3) ही  समिती अर्जदाराची वंशावळ तपासणी करेल 

4) यानुसार जुन्या नोंदी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला, वाडवडिलांच्या नोंदी यांसारखे कागदपत्र तपासले जातील

5) चौकशीचा अहवाल मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी हे अर्जदाराला प्रमाणपत्र देण्याचा किंवा नाकारण्याचा निर्णय घेतील

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Documents required for Maratha Kunbi caste certificate)

1) जर अर्जदार भूधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करणारा असेल, तर त्या संबंधित जमीनधारकतेचा पुरावा सादर करणे आवश्यक.

2) वरील पुरावा उपलब्ध नसल्यास, अर्जदाराने 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत होते, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक.

3) अर्जदाराच्या गावातील किंवा कुलातील नातेसंबंधीत व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास, त्यांचे नातेसंबंध सिद्ध करणारे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक.

4) याशिवाय अर्जासोबत इतर कोणतेही पुरावे (जसे की जुनी कागदपत्रे, उत्पन्न दाखले, शालेय दाखले इ.) जोडता येतील. 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget