How to check your name in voters list : मतदार यादीत तुमचे नाव आहे का? असे तपासा एका क्लिकवर!
राज्यात 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतदानासाठी केवळ मतदार ओळखपत्र असून चालत नाही, तर मतदार यादीत नाव असणे अनिवार्य असते.

राज्यात 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतदानासाठी केवळ मतदार ओळखपत्र असून चालत नाही, तर मतदार यादीत नाव असणे अनिवार्य असते. अनेकदा ऐनवेळी नाव न सापडल्याने मतदारांची धांदल उडते. ही गैरसोय टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
तुमचे नाव यादीत शोधण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:
नाव शोधण्याची सोपी प्रक्रिया:
१. वेबसाईटला भेट द्या: सर्वात आधी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला voters.eci.gov.in भेट द्या.
२. पर्याय निवडा: होमपेजवर दिसणाऱ्या 'Search Your Name in Voter List' या पर्यायावर क्लिक करा.
३. माहिती भरण्याचे प्रकार: तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. तिथे नाव शोधण्यासाठी तीन पर्याय मिळतील:
EPIC (ओळखपत्र) नंबरद्वारे
वैयक्तिक माहितीद्वारे (Search by Details)
मोबाईल नंबरद्वारे
४. तपशील भरा: आपण 'Search by Details' हा पर्याय निवडल्यास, तिथे तुमचे राज्य, भाषा, स्वतःचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, जन्म तारीख, वय, लिंग, जिल्हा आणि तुमचा विधानसभा मतदारसंघ ही माहिती अचूक भरा.
५. कॅप्चा कोड: सर्व माहिती भरल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड (Captcha) टाईप करा आणि 'Search' वर क्लिक करा.
६. माहिती तपासा: जर तुमचे नाव यादीत असेल, तर खाली तुमची माहिती दिसेल. त्यानंतर 'View Details' वर क्लिक करा.
७. मतदान केंद्राची माहिती: येथे तुम्हाला तुमचे नाव, मतदान केंद्र (Polling Station), भाग क्रमांक आणि अनुक्रमांक अशी सर्व महत्त्वाची माहिती पाहायला मिळेल.
८. स्लिप डाऊनलोड करा: सर्वात शेवटी 'Print Voter Information' या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमच्या मतदान माहितीची पीडीएफ (PDF) डाऊनलोड करू शकता. ही प्रिंट तुम्हाला मतदानाच्या दिवशी ओळख म्हणून सोबत ठेवता येईल.
























