एक्स्प्लोर

भंडाऱ्यात भीषण अपघात! पाच जणांचा जागीच मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी

भंडाऱ्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. वऱ्हाड्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.

Bhandara Accident News : भंडाऱ्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. वऱ्हाड्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये चार महिला आणि एका पुरुषांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील सौंदड इथं ही घटना घडली आहे.

अड्याळ येथील वऱ्हाडी कोंढा येथून विवाह आटोपून अड्याळ गावाकडे परत येत असताना अपघात घडला आहे. व्हॅनमध्ये 9 जण होते. त्यापैकी 5 वऱ्हाड्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आगे तर दोन जण गंभीर असून अन्य दोन किरकोळ जखमी आहेत. गंभीर दोघांना भंडाऱ्याला हलविले तर, किरकोळ दोघांवर अड्याळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुर आहेत.

अड्याळ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सौंदड येथील घटना आहे. वऱ्हाड्यांच्या व्हॅनचा टायर फुटल्याने जाणाऱ्या ट्रेलरवर व्हॅन धडकून भीषण अपघात झाला आहे. घटनास्थळी अड्याळ पोलीस आणि परिसरातील नागरिकांची मदतीसाठी धाव. ही संपूर्ण माहिती अड्याळ पोलिसांनी दिलेली आहे.

पिकअपची दुचाकीला जोरादार धडक, एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू

वाशिम जिल्ह्यात भीषण अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिम मंगरुळपीर महामार्गावर पारडी  टकमोर गावाजवळ आंबे वाहून नेणाऱ्या पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की अपघातनंतर पिकअप वाहन रस्त्यालगत असलेल्या शेतात खाली पलटी झाला आहे. पिकअप वाहनात या धडकेत वारा देपुळ गावातील एकाच कुटंबातील तीन जण जागीच ठार झाले आहेत. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

गोंदिया जिल्ह्यात भरधाव टिप्परने माय-लेकाला चिरडले, भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

गोंदियाच्या तिरोडा शहरातील सुकडी नाका परिसरात आज सायंकाळी एका भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. ज्यामध्ये माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. काटी-बिरसोला येथील रहिवासी असलेले चौधरी कुटुंब मोटारसायकलने प्रवास करत असताना सुकडी नाका परिसरात पाठीमागून येणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवर स्वार असलेल्या हंसलता चौधरी (वय 35) आणि त्यांचा 9 वर्षांचा मुलगा तन्मय चौधरी हे दोघेही चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोटारसायकल चालक कामस धर्मदास चौधरी हे या अपघातात जखमी झाले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.अपघात घडल्यानंतर आरोपी टिप्पर चालक आपल्या वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी तातडीने धाव घेत मृतदेहांचा पंचनामा केला आणि ते उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget