कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने असलेल्या शहरात लॉकडाऊन काढले जाण्याची शक्यता कमी : अनिल देशमुख
जी शहरं ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आहेत, तिथे काही प्रमाणात सूट मिळू शकते, असं अनिल देशमुख म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः याबद्दल घोषणा करतील, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेविषयी माहिती देताना लॉकडाऊन आणखी वाढण्याचे संकेत अनिल देशमुख यांनी दिले.
अनिल देशमुख यांनी म्हटलं की, राज्याचा गृहमंत्री म्हणून मी पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत सहभागी होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्वच राज्यातील मुख्यमंत्र्यांची अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र ज्या शहरांमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आहेत, तिथे लॉकडाऊन काढले जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र जी शहरं ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आहेत, तिथे काही प्रमाणात सूट मिळू शकते, असं अनिल देशमुख म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः याबद्दल घोषणा करतील, असंही अनिल देशमुख म्हणाले.
विशेष गृहसचिव अमिताभ गुप्तांची चौकशी पूर्ण
वाधवान कुटुंबाला लॉकडाऊनमध्ये प्रवास करण्याची परवानगी मिळाल्याच्या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता यांची चौकशी झाली आहे. त्या चौकशीमध्ये अमिताभ गुप्ता यांनी त्यांचं विस्तृत उत्तर सादर केलं आहे. अमिताभ गुप्ता यांनी त्यांच्या उत्तरात सांगितले आहे की वाधवान कुटुंबाला फक्त मानवी दृष्टिकोनातून परवानगीचे पत्र दिले होते. आता वाधवान कुटुंबाला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आल्याचं अनिल देशमुख म्हणाले. दरम्यान या प्रकरणात राजकारण व्हायला नको होते, असं मतही अनिल देशमुखांनी व्यक्त केलं.
PM Modi | कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार हे समजून धोरणं ठरवा : पंतप्रधान मोदी
राज्यात मोठ्या संख्येने इतर राज्यातील मजूर अडकले आहेत. परप्रांतीय मजुरांचा त्यांच्या राज्यात परतण्यासाठी दबाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आज त्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्री त्याबद्दल माहिती देतील. राज्य सरकार सर्व मजुरांची काळजी घेत आहे, असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं.
Vaccine on Corona | कोरोनावरील लस भारतात तयार होणार! 'सीरम' इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांची माहिती