Amit Shah Maharashtra Tour : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह (Minister Amit Shah maharashtra Tour) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने शाह यांच्या या दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर ते प्रवरानगर इथल्या देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावतील. या मेळाव्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती असेल. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर इथं विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा मेळावा आयोजित करण्यात आलाय. अमित शाह पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा दौरा करणार आहेत. 


शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनानं शाहांचा दौरा सुरु होईल. सकाळी 11.15 वाजचा दर्शनासाठी मंदिरात दाखल होणार आहे.  त्यानंतर अमित शाह सकाळी 11.45 वाजता प्रवरानगर येथील देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावतील. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती असणार आहे. 


सहकाराची सुरूवात झालेल्या प्रवरा येथे देशातील पहिल्या सहकार परिषदेत विचारमंथन होणार आहे. आमदार राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे पाटील सहकार परिषदेचे आयोजन केले आहे. सहकार क्षेत्रातील तज्ञ लोक यात सहभागी होणार आहेत. शिवाय सहकार विषयावर चर्चा होणार आहे.

 

आजच्या या सहकार परिषदेत सहकार मंत्री अमित शाह सहकार संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करणार का याकडे लक्ष लागून आहे. राज्यात सहकारी कारखाना आणि भ्रष्टाचाराची राजकीय वर्तुळात चर्चा असतानाच शाह यांचा दौरा महत्वाचा ठरणार आहे.

 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha






इतर महत्वाच्या बातम्या