Raise Marriage Age of Women from 18 to 21 : मुलीच्या लग्नासाठी सध्या किमान 18 वर्षे वयाची अट आहे. मात्र लवकरच यात बदल होऊ शकतो. कारण मुलीच्या लग्नाचं किमान वय 18 वर्षांवरून 21 वर्ष करण्याच्या प्रस्तावावर सरकार दरबारी हालचाली सुरु झाल्या आहेत. या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. विवाहाचं वय वाढवण्यासाठी बालविवाह कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक संसदेत मांडण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून याविषयीचे संकेत दिले होते.
मुलींचे लग्नाचे किमान वय लवकरच 18 वरून 21 वर्षे केलं जाऊ शकतं. त्यासाठी सरकारने तयारी सुरु केली आहे. यासंबंधीचे विधेयक संसदेच्या या अधिवेशनात मांडलं जाण्याची शक्यता आहे. विवाहाचं वय वाढवण्यासाठी बालविवाह कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. सध्या या कायद्यात मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा 18 ठेवण्यात आली आहे.
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कायद्यात बदल करण्याच्या दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा झाली. गेल्या वर्षी या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सनं आपल्या अहवालात लग्नाचं किमान वय 18 वरून 21 वर्षे करण्याची शिफारस केली होती. माजी खासदार जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. टास्क फोर्सनं आपल्या अहवालात आई बनण्याची वयोमर्यादा आणि महिलांशी संबंधित इतर समस्यांबाबतही आपल्या शिफारशी दिल्या होत्या.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात, सध्याची परिस्थिती लक्षात घेता लग्नाचं वय वाढवण्याच्या शक्यतेचा विचार करणार असल्याची घोषणा केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी; निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
- OBC Reservation : ओबीसी आरक्षण रद्द झालं म्हणजे नेमकं काय?, सुप्रीम कोर्टाचा निर्णय सोप्या शब्दात
- OBC Reservation : ठाकरे सरकारला धक्क्यावर धक्के, आरक्षणाबाबतचा अध्यादेश रद्द, आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक
- OBC Reservation : राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका, केंद्राने इम्पिरिकल डेटा देण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह'