Thane Fire: ठाणे जिल्ह्यातील कृष्णा भवन इमारतीच्या 13व्या मजल्यावर (17 डिसेंबर 2021) भीषण आग लागल्याची आज घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग कशामुळं लागली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. दरम्यान, अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आलीय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. 


ठाण्यातील कपूरबावडा परिसरात इमारतीला आज सकाळी आग लागली होती. या आगीनंतर परिसरात धुरांचे लोट पसरले होते. घटनास्थळी अग्निशमन दलाने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने इमारत रिकामी केली. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. ठाणे अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि आरडीएमसीनं कृष्णा सोसायटीतील सुमारे 45 ते 50 रहिवाशांची सुटका केलीत. सुदैवानं, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 


दरम्यान, पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात परफ्यूम आणि प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीला गुरुवारी आग लागली होती. या आगीची माहिती होताच अग्निशमन दलानं घटनास्थळी घेऊन आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवितहान न झाल्याची माहिती एएनआयनं वृत्त संस्थेनं दिली होती. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha