Holi Dhulivandan LIVE : सर्वत्र धुलिवंदनाचा उत्साह; जाणून घ्या प्रत्येक ठिकाणचे अपडेट्स

धुळवडीवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीत मात्र, या सणाच्या निमित्ताने गृहखात्याने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आज सर्वत्र धुळवडीचा उत्साह आहे.. जाणून घ्या प्रत्येक अपडेट्स..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Mar 2022 10:40 AM
बेळगाव शहरात रंगपंचमीचा आनंद डॉल्बीच्या दणदणाटात आणि रंगांची उधळण करून साजरा





गेल्या दोन वर्षापासून रंगपंचमी साजरी करायला मिळाली नसल्याने यावर्षी मुक्त वातावरणात बेळगाव करानी रंगपंचमी साजरी केली.शहरात अनेक ठिकाणी रंगपंचमी निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.आमदार अभय पाटील आयोजित होळी मिलन कार्यक्रमात तर हजारो तरुण तरुणी उत्साहाने सहभागी झाले होते.डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकत असल्याचे दृश्य शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळाले.शहरातील अनेक गल्ल्यांमध्ये डॉल्बी लावून तरुण नृत्य करत होते.अनेक ठिकाणी नृत्य करणाऱ्या तरुणावर पाईपने पाणी करण्यात येत होते. चव्हाट गल्ली,खडक गल्ली या ठिकाणी तरुण मंडळी मोठ्या संख्येने जमून डॉल्बीच्या तालावर नृत्य करत होती.


 

 



 


Nana Patole News : काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या सुकळी गावी साजरी केली होळी

 काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी होळी भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्याच्या आपल्या सुकळी या गावी साजरी केली. विविध रंगाची उधळण करीत नाना पटोले यांनी होळी उत्सव आपल्या कार्यकर्त्यांसोबत साजरा केला. विशेष म्हणजे नाना पटोले प्रत्येक सण आपल्या गावात येत कुटुंबीयांसोबत साजरा करत असल्याने गावात सुध्दा जल्लोषाचं वातावरण असते. यावेळी नानांनी गुलाल लावून कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.

PM Modi Holi Wishes: पंतप्रधान मोदींकडून होळीच्या शुभेच्छा...

कल्याण डोंबिवलीत महिलांमध्ये रंग पंचमीचा उत्साह 

गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक सणावर कोरोनाचं सावट होतं . घरात राहून अत्यंत साधेपणाने सण साजरे केले जात होते . मात्र यंदा कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने यंदा होळी व रंगपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत . कल्याण-डोंबिवलीचा सकाळपासूनच नागरिकांमध्ये रंगपंचमीचा उत्साह दिसून आला. कल्याणमधील बेतुरकर पाडा परिसरात चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात  महिलांनी रंगपंचमी साजरी केली. जवळपास दोन वर्षांनी सण साजरा करत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. या महिला आपल्या चिमुकल्या मुलांसह रंगपंचमी खेळत रंगाची उधळण करत होत्या

सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावचा गिरोबा उत्सव
कोकणात सण म्हटलं की वेगवेगळ्या रूढी परंपरा आणि उत्साहाचे वातावरण पहायला मिळत. गणेशोत्सवानंतर कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे शिमगोत्सव. शिगमोत्सवात सिंधुदुर्गात वेगवेगळ्या रूढी परंपरा पहायला मिळतात. अशीच एक आगळीवेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावचा गिरोबा उत्सव. सांगेली गावात महाशीवरात्रीला फणसाचं झाड देव म्हणून निवडलं जात. होळीला हे झाडं तोडून विशिष्ट गोलाकार आकार देऊन त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते आणि मध्यरात्री विधीवत प्राणप्रतिष्ठापणा करून पूजल जात. सांगेली गावचं ग्रामदैवत फणसाचं झाड असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे. कोकणात इतर मंदिरात दगडी पाषण असत मात्र सांगेली गावात मात्र फणसाच्या झाडापासून शिवलिंगाच्या आकाराचा पाषण बनवलं जात

 

हिंदू संस्कृतीत वड, औदुंबर, पिंपळ अशा वृक्षांना दैवत्व मानलं जातं. अशीच एक परंपरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली गावात फणसाच्या झाडाला गिरिजानाथ म्हणून दैवत्व मानलं जात. कोकणात शिमगोत्सवाचा हा अनोखा थाट पहायचा असेल तर सांगेलीत गेलंचं पाहिजे. गिरोबाचे पाषाण हे फणसाच्या खोडातून तयार होते. यामुळे सांगेलीतील ग्रामस्थ फणसाच्या झाडाला देव मानतात. दरवर्षी या देवाची प्रतिष्ठापना होते. सांगेली गाव म्हणजे निसर्गसंपन्न आणि विपुल अशा फणसाच्या झाडांची भूमी. या गावावर गिरोबाची कृपादृष्टी आहे. असा गाववासीयांचा विश्वास दृढ आहे.  गिरोबा या दैवताची निर्मितीच फणसाच्या खोडातून होते. यामुळे फणसाचे झाड कुठेही दिसले तरी देव भेटल्याप्रमाणे गावातील माणसे त्याला नमस्कार करतात. या गावात फणसाच्या झाडावर होळीव्यतिरिक्त कधीही शस्त्र चालवले जात नाही. या उत्सवात जिल्हावासीयांबरोबर गोवा, कर्नाटक भागातूनही भाविक दरवर्षी मोठय़ा संख्येने दाखल होत असतात. त्यामुळे कोकणातील शिमगोत्सवाला पर्यटनाच्या दृष्टीने विचार करून प्रचार केल्यास रोजगार निर्मितीला मोठा वाव आहे.
फुगा लागल्याने दुचाकी आणि सायकलस्वाराचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू

विरार : विरार पश्चिम आगाशी येथे धूळवडीसाठी वापरला जाणारा फुगा लागल्याने दुचाकी आणि सायकलस्वाराचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यात सायकलवरील 54 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून अर्नाळा पोलिसांनी दुचाकी चालकांना ताब्यात घेतले आहे. फुगे मारण्यावर बंदी असतानाही होळीच्या सणाच्या वेळी अनेक जन रस्त्यावर जाणाऱ्यांना फुगे मारून आपला आनंद साजरा करत असतात. पण त्यामुळे अनेकांना दुर्घटनेचे बळी व्हावे लागत आहे. अशीच एका घटना आज (गुरुवारी) आगाशी चाळपेठ परिसरात घडली आहे.  बूट पॉलिशचे दुकान बंद करून होळी सण साजरा करण्यासाठी घरी चालेलेल्या रामचंद्र हरिनाथ पटेल हे या घटनेचे बळी ठरले आहेत. रामचंद्र हे सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास विरारवरून चाळपेठच्या दिशेने जात असताना, होळीसाठी लाकडं आणायला गेलेल्या एका गाडीतून काही मुलं पाण्यानी भरलेले फुगे रस्त्यावर फेकून मारत होते. यातील एक फुगा अर्नाळा ते विरारच्या दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या मुलांना लागला आणि त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते सायकलवरून घरी जात असलेल्य रामचंद्र यांना जावून धडकले. यात रामचंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रामचंद्र यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि दोन दुचाकी स्वारांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. दुचाकीस्वार हे अर्नाळा गावातील तरुण आहेत.यासंदर्भात माहिती देताना अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी फुगा लागल्याने अपघात झाला की नाही? हे स्पष्ट केले नाही. पण चौकशी करून अपघाताचे कारण सांगितले जाईल असे ते म्हणाले.

Mumbai Holi News : राजकीय नेत्यांची जोरदार धुळवड

Mumbai Holi News : मुंबईमध्ये धुळवड मोठ्या उत्साहात साजरी होत असून, राजकीय नेते देखील धुळवड जोरदार साजरी करत आहेत. एरव्ही राजकीय धुळवड करणारे हे नेते आज आपल्या कार्यकर्त्यांसोबत रंग उधळत आहेत. भाजप नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी आज देखील आज धुळवड साजरी केली.

Kalyan Dombivali News - कल्याण डोंबिवलीत उत्साहात धुळवड साजरी 

कोरोनामुळे गेली दोन वर्षे होळी व धुळवड अत्यंत साधे पणाने साजरी केली जात होती .मात्र यंदा कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने सणावरील निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये धुळवड साजरी करण्यात एकच उत्साह दिसून येतोय . सकाळपासूनच गुलाल रंगाची उधळण करत होळीच्या गाण्यांवर तरुणांची पावलं थिरकत होती .तर मोठ्यापाठोपाठ लहान मूल देखील हातात पिचकाऱ्या घेत धुळवडीच्या आनंद घेताना दिसत होते . आज धुळवडच्या निमित्ताने जेवणात खास मटणाचा बेत आखला जातो, लवकर मटण मिळावं यासाठी अनेक नागरिकांनी कल्याणात मटनाच्या दुकानाबाहेर रांगा लावल्याच्या दिसून आलं .

Mumbai Holi News : मुंबईकरांची मनसोक्त धुळवड
ज्यांनी मागील दोन वर्षापासून आपल्या घरात राहून धुळवड साजरी केली ते मुंबईकर आता मनसोक्त घराबाहेर येऊन आपल्या मित्र परिवारास सोबत धुळवड साजरी करताय. चिमुकले असू द्या किंवा तुम्ही मग जेष्ठ नागरिक, तरुणाई असू दे किंवा मग महिला वर्ग सगळे या  धुळवडीला एकत्र येऊन रंग खेळताना पाहायला मिळतात. मुंबईतील सोसायट्यांमध्ये खास रेन डान्स करत धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतो
Konkan Shimga Utsav : दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर कोकणात शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात

Konkan Shimga Utsav :  दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर कोकणात शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. कोकणातील शिवसेनेचे आमदार. भास्कर जाधव हेदेखील दरवर्षीप्रमाणे आज त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी देहभान विसरून ग्रामदेवता श्री शारदादेवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचवताना दिसले. आपल्या ग्रामदेवतेवर प्रचंड श्रद्धा असलेले आमदार जाधव हे काहीही झाले आणि कुठेही असले तरी नवरात्र उत्सवात शारदेच्या दरबारात पारंपरिक जाखडी नृत्य करण्यासाठी आणि शिमगोत्सवात पालखी नाचविण्यासाठी पोहोचतात. आजदेखील गावच्या सहाणेसमोर होम पेटवण्यात आल्यानंतर ग्रामस्थांसह ढोल-सनईच्या ठेक्यावर पालखी नाचविताना ते तल्लीन होऊन गेले होते.


 

पार्श्वभूमी

Holi Dhulivandan Guidelines : होळीच्या (Holi 2022)  दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा उत्साह असतो. गेली दोन वर्ष कोरोना व्हायरसमुळं (coronavirus) सणांवर निर्बंध असल्यानं साजरे होऊ शकले नाहीत. यंदा मात्र कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानं महाराष्ट्रात अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. 17 तारखेला होळी आणि आज 18 तारखेला धुलिवंदनाचा सण निर्बंधमुक्त साजरा केला जाणार आहे. धुळवडीवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीत मात्र, या सणाच्या निमित्ताने गृहखात्याने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 


राज्याच्या गृहखात्याकडून मार्गदर्शक सुचना व नवी नियमावली


-कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतो गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणूक नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा.


-एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येते. परंतु यंदाची होळी साधेपणाने साजरी करावी, असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं.


-होळी, शिमग्यानिमित्त विशेष करून कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात.


- तसेच गर्दी न होण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी. 


-कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करावे


मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं


कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्यानं मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. सध्या कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानं अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. काल 17 तारखेला होळीचा सण महाराष्ट्रात साजरा केला गेला. निर्बंध हटवल्यानं होळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळाला. राज्यातील विविध भागांमध्ये आपापल्या परंपरांनुसार होळी साजरी करण्यात आली.


संबंधित बातम्या


Share Market : दलाल स्ट्रीटवर रंगांची उधळण; Sensex मध्ये 1,047 तर  Nifty मध्ये 311 अंकांची उसळण


Holi 2022 : होळी आधी आणि नंतर 'अशी' घ्या त्वचेची काळजी; फॉलो करा तज्ज्ञांनी दिलेल्या सोप्या टिप्स


 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.