Santosh Bangar : आमदार संतोष बांगर यांचं शक्तीप्रदर्शन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे प्रेमाचं दर्शन
Hingoli MLA Santosh Bangar News : हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केल्यानंतर शिंदे गटाचे शिवसेना आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Hingoli MLA Santosh Bangar News : हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केल्यानंतर शिंदे गटाचे शिवसेना आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. संतोष बांगर यांनी मंगळवारी शेकडो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री ग्सेट हाऊस बाहेर शक्तीप्रदर्शन केले. संतोष बांगर समर्थक जवळपास 20 ते 25 बसमध्ये आले होते. यावेळी बांगर यांच्यासह समर्थकांनी हमारा नेता कैसा हो एकनाथ भाई जैसा हो, अशी घोषणाबाजी केली. सह्याद्री गेस्ट हाऊसच्या बाहेर संतोष बांगर समर्थकांनी गर्दी केली होती.
यावेळी बोसलाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे शक्ती प्रदर्शन नाही, हे प्रेमाचं दर्शन आहे, अशी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे म्हणाले की, संतोष बांगर आणि सर्व पदाधिकारी इथे आले. त्यांची शक्ती किती आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यांची विकासकामे प्रश्न असतील त्यांना आम्ही मदत करू. हा बाळासाहेब यांच्या विचारांचा गट आहे. ज्यांना हिंदुत्वाची भूमिका पटत आहे ते सोबत येत आहेत. विकास कामं राज्यसरकार कुठेही प्रलंबित ठेवणार नाहीत. शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार विकास कामं करतील.
माझ्या संपर्कात ज्यांना आमचे विचार पटलेले आहेत, त्यांना आमच्या सोबत काम करायचं आहे. 50 हजार रक्कम शेतकऱ्यांना दिली होती, त्यांना यातून वागळलं जाईल का असा प्रश्न निर्माण झाला. काल मला खासदार धैरशील माने भेटले. आमची पहिल्यापासून भूमिका आहे की ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे. तुषार मेहता यांची भेट आम्ही दिल्लीत घेतली होती. मंगळवारी पुन्हा सुनावणी आहे, आणि आमचा शासनावर पूर्ण विश्वास आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
एक आदिवासी महिला उमेदवार आहेत आणि आमचं समर्थन त्यांना आहे. सर्व खासदारांच देखील हेच म्हणणं आहे की आदिवासी समाजाला न्याय द्यायचा आहे. या समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही केलं आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.