Aurangabad: हिजाब गर्ल मुस्कान खानला औरंगाबाद शहरात येण्यास बंदी
Aurangabad: औरंगाबाद येथील आमसाख मैदानावर आज मोहम्मद पैंगबर बिल या विषायाच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमात हिजाब गर्ल बीबी मुस्कान खानचा आज सत्कार केला जाणार आहे.
Aurangabad: औरंगाबाद येथील आमसाख मैदानावर आज (14 मार्च 2014) मोहम्मद पैंगबर बिल या विषायाच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमात हिजाब गर्ल बीबी मुस्कान खानचा सत्कार केला जाणार आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलिसांनी मुस्कान खानला औरंगाबाद शहरात येण्यात बंदी घातली आहे. मुस्कान खान ही औरंगाबादमध्ये आल्यास शहरात वातावरण बिघडून सार्वजनिक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. यामुळं मुस्कनला शहरात प्रवेश नाकारण्याच पोलीस आयुक्तांनी आदेश काढले आहेत. कर्नाटकच्या मुलीला औरंगाबाद पोलिसांनी मराठीतून नोटीस पाठवली आहे.
वंचित बहुजन आघाडी पोलिसांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव
मुस्कान खान हीला औरंगाबाद प्रवेश बंदीसाठी औरंगाबाद पोलिसांनी रविवारी रात्री साडेनऊ वाजता नोटीस पाठवली आहे. औरंगाबाद पोलिसांनी कार्यक्रमास परवानगी नाकारल्यानं वंचित आघाडीनं न्यायालयात धाव घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीनं औरंगाबाद पोलिसांच्या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलीय.
हिजाब गर्ल मुस्कान खानचा सत्कार होणार
औरंगाबादच्या आमसाख मैदानावर आज सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत मोहम्मद पैंगबर बिल या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम असून त्याच कार्यक्रमात हिजाब गर्ल मुस्कान हिचा सत्कार केला जाणार होता. सदर कार्यक्रमास सदर कार्यक्रमास वंचित बहुजन आंबेडकर, देश प्रवक्ता फारूख अहमद, राज्य उपाध्यक्ष सिध्दार्थ मोकळे, मुस्लीम ईत्तेहाद फ्रंटचे जावेद कुरेशी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
नोटीस देण्यामागचं कारण काय?
मुस्कान हुसैन खान ही औरंगाबाद शहरात आल्यास शहराचे वातावरण बिघडुन सार्वजनिक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन मनुष्याच्या जिवितास, खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेस धोका उत्पन्न होण्याचा संभव आहे. त्यामुळे मुलगी नामे बीबी मुस्कान हुसैन खान यांना औरंगाबाद शहरात येण्यास प्रतिबंध करणे अत्यंत निकडीचे आहे, असं कारण दाखवून औरंगाबाद पोलिसांनी मुस्कान हुसैनला काल नोटीस पाठवली आहे.
हे देखील वाचा-
- 'पेपर फुटला' असं नाही, पुन्हा पेपर घेण्याचा प्रश्नच नाही; राज्य शिक्षण मंडळाचं स्पष्टीकरण
- खाद्य तेलाच्या किमतींवर युक्रेन रशियाचा युद्धाचा परिणाम; सोयाबीनचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांना लाभ पण...
- HSC Exam Paper Leak : श्रीगोंद्यात गणिताचा पेपर फुटला; बारावी बोर्डाच्या परीक्षांमधील पेपरफुटीचं सत्र थांबेना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha