कोरोना संकटात महाराष्ट्र युवा काँग्रेसचा मदतीचा हात, सर्व जिल्ह्यांसाठी हेल्पलाईन नंबर
कोरोना संकटात महाराष्ट्र युवा काँग्रेसने मदतीचा हात पुढे करत सर्व जिल्ह्यांसाठी हेल्पलाईन नंबर सुरु केले आहेत.
मुंबई : एकीकडे दिल्लीत युवा काँग्रेसने कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी वॉर रूम सुरू केली तशीच महाराष्ट्रातही युवा काँग्रेसने राज्यातील नागरिकांना कोरोना काळात मदत करण्यासाठी मदत अभियानची सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णसंख्या जशी वाढत आहे तशी बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर यासाठी नागरिक मदत मागत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक हतबल होत असताना चित्र आहे. त्यांना महाराष्ट्र युवा काँग्रेसने मदतीचा हात दिला आहे. युवा काँग्रेर्सने यासाठी हेल्पलाईन नंबर सुरू केले आहेत.
महाराष्ट्र युवा काँग्रेसचे काम प्रामुख्याने युवा काँग्रेसच्या युवती बघत आहेत. ह्यात मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार देखील आहे. लोकांना मदत करणाऱ्या युवतींची टीम
1. डॉ.वैष्णवी किराड
2. शिवानी वडदेतीवर
3. कॅरिना झेविअर
4. स्नेहल धोके पाटील
ह्या तिघींच्या मदतीला ब्रिज दत्त आणि शिवाजी मोरे आहेत. सर्व जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र युवा काँग्रेसने हेल्पलाईन सुरू केली आहे. दररोज सरासरी युवा काँग्रेसला दीड हजार लोकांचे महाराष्ट्रातून फोन येतात.
तर सोशल मीडिया वर SOS हशटॅग वापरूनही लोक मदत मागत आहे. सोशल मीडियावरून ही सरासरी 2000 विनंती युवा काँग्रेसला येत आहेत. हे सर्व युवा काँग्रेसचे साथीदार आपल्या घरून फोन वरून संपर्क करून कोऑर्डीनेशन करतात. कुणाला बेड, कोणाला इंजेक्शन यासाठी युवा काँग्रेस टीम मदत करत आहे.
दिल्लीत श्रीनिवास व्ही.बी. या अखिल भारतीय युवा काँग्रेस अध्यक्षांनी अनेकांना ट्विटरवर मदत केली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही युवा काँग्रेसने संपूर्ण महाराष्ट्रासाठी मदतकार्य सुरू केलं आहे. त्यामुळे राज्यात कुणालाही मदत हवी असल्यास ते जिल्हानिहाय विभाग निहाय हेल्पलाईन वर मदत मागू शकतात तसेच ट्विटर, फेसबुक माध्यमातून ही मदत मागू शकतात.
अडचणींच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून आता अनेकदा लोक मदतीसाठी मेसेज करतात. त्याच माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न युवा काँग्रेस करत आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा झाल्यावरही युवा काँग्रेसने रक्तदान मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली होती. आता कोरोना काळात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना धीर देण्याचे मदतीचे काम महाराष्ट्र युवा काँग्रेस करत आहे.