एक्स्प्लोर

Maharashtra weather : 25 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम, 26 ऑगस्टपासून उष्णतेचा पारा वाढणार, वाचा हवामानाचा अंदाज 

25 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे.

Maharashtra weather News : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) पडतोय, तर काही भागात पावसानं विश्रांती घेतलीय. दरम्यान, 25 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. 26 ते 30 ऑगस्ट यादरम्यान, पुन्हा उष्णतेचा पारा चढणार असल्याचे खुळे म्हणाले. तर 31 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान पुन्हा पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले.  

उद्या 16 जिल्ह्यात पावसाची शक्यता

25 ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता कायम असल्याचे खुळे म्हणाले. विशेषतः शनिवार दिनांक 24 ऑगस्टला नाशिक नंदुरबार धुळे जळगांव पुणे सातारा कोल्हापूर मुंबई ठाणे रायगड अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या 16 जिल्ह्यात तर  रविवारी दिनांक 25 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात दुपारनंतर गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. तर सोमवार दिनांक 26 ते शुक्रवार 30 ऑगस्ट दरम्यानच्या पाच दिवसादरम्यान कमाल तापमान वाढीबरोबर महाराष्ट्रात पुन्हा उन्हाचा पारा चढण्याची शक्यता जाणवते.

दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दरम्यान, सध्या राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. नदी नाले धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

सप्टेंबर महिन्यात कसा असेल पाऊस?

शनिवार दिनांक 31 ऑगस्ट ते गुरुवार दिनांक 5 सप्टेंबरच्या पहिल्या सप्ताहात महाराष्ट्रात पुन्हा मध्यम पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः संपूर्ण विदर्भ, खान्देश, नाशिक व मुंबईत अशा 16 जिल्ह्यात कदाचित एखाद्या-दुसऱ्या दिवशी तर जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नसल्याचे खुळे म्हणाले. सप्टेंबर महिना हा अधिक  प्रकाशमान दिवसाचा व उष्णतेचा महिना असतो. मुंबईसह कोकणात 15, नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात 10 ते 12, तर उर्वरित विदर्भ, संपूर्ण मराठवाडा खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर  जिल्ह्यात 5 ते 7 अशा सरासरी पावसाळी दिवसाचा हा महिना असतो. यावर्षी 1 ते 5, व 12 ते 16 आणि 25 ते 29 सप्टेंबर अशा प्रत्येकी पाच दिवसाच्या तीन आवर्तनातून महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात अंदाजे दहा ते बारा पावसाळी दिवसातून पावसाची तसेच धरणे ओसंडून नद्या खळखळण्याची व विहिरी व जमीन पाणीपातळीत वाढीची अपेक्षा असल्याचे खुळे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Weather update : राज्यात पावसाचा जोर वाढला, पुणे, मुंबईसह या जिल्ह्यांना पुढील हायअलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Embed widget