एक्स्प्लोर

विदर्भाला पावसाचा तडाखा, नागपुरात येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

विदर्भाला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. नागपुरात दिवसभर नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले, तर तिकडे चंद्रपुरातही पावसाने हाहाकार माजवला आहे.

नागपूर : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन यंदा खास नागपुरात घेण्यात येत आहे. मात्र, रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने अधिवेशनाचा आजचा दिवस पाण्यात गेल्याचं पाहायाला मिळालं. कारण, साचलेल्या पाण्यामुळे विधीमंडळ परिसराला तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं. त्याचबरोबर विधानभवनातील बत्तीही काहीकाळ गुल झाली. परिणामी विधीमंडळाचं आजचं कामकाज रद्द करण्यात आलं. आकडेवारी पाहता नागपुरात 24 तासात 61.7 मिमी पाऊस झालाय. तर गेल्या तीन तासात तब्बल 162.7 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. तर येत्या 24 तासात हवामान विभागाने नागपुरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान, सकाळपासून झालेल्या पावसामुळे नागपूर शहरातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर विमानतळावरही पाणी साचलं आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी आहे. तर उद्या नागपुरातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात येत असल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली. चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा तडाखा, मोठं नुकसान चंद्रपूर जिल्ह्याला आज सकाळपासून पावसाचा मोठा तडाखा बसला. चंद्रपूर जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पावसाला सुरुवात झाली होती, मात्र आज सकाळपासून पावसाने मुसळधार बरसायला सुरुवात केली आणि यामुळे जिल्ह्याला पावसाचा मोठा तडाखा बसला. मुसळधार पावसामुळे शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे वरोरा-चिमूर मार्गावरील बेंबाळ येथे पुलाला मोठे भगदाड पडले आहे. चौपदरीकरण होत असलेल्या वरोरा-चिमूर मार्गावर बेंबाळ येथे हा पूल बांधण्यात येत होता. मात्र आज सकाळी पावसाच्या तडाख्यामुळे पुलाला मोठे भगदाड पडले आणि मोठ्या प्रमाणात रस्ता खचून गेला. सध्या चिमूर ते वरोरा ही वाहतूक पूर्ण पणे बंद करण्यात आली आहे. दुसऱ्या एका घटनेत याच चिमूर-वरोरा मार्गावर एसटी महामंडळाची एक बस रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या खाली उतरली. चिमूरकडून चंद्रपूरला येत असलेल्या या बसला बोथली येथे रस्त्यावरील पाण्याचा अंदाज आला नाही आणि बस रस्त्याच्या खाली उतरली. या बसमध्ये अंदाजे 50 प्रवासी होते, मात्र सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. या पावसामुळे पोंभुर्णा तालुक्यात वैनगंगा नदीत एक शेतकरी वाहून गेला असून त्याचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. घाटकूळ परिसरात विनोद बोडेकर हा 34 वर्षीय शेतकरी आपल्या तीन मित्रांसोबत नदीतील मोटारीचे पाईप काढायला गेला होता. मात्र अचानक वैनगंगा नदीतील पाणी वाढल्याने हे चौघही नदीत वाहू लागले. यातील तिघे जण कसेबसे किनाऱ्यावर पोहोचले, मात्र विनोद बोडेकर हा नदीच्या पाण्यात वाहून गेला. पाण्यात वाहून गेलेल्या या शेतकऱ्याचा शोध सुरु आहे. नदी-नाल्यांना अचानक आलेल्या या पुरामुळे  पोथरा नदीच्या पुरात अडकलेल्या 11 मजुरांना वाचवण्यात आले आहे. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या खांबाडा गावाशेजारी पॉवरग्रीडचे टॉवर उभारणीचे काम सुरु आहे. या कामात असलेले 40 ते 50 परराज्यातील मजूर पोथरा नदीच्या शेजारी असलेल्या शेतात गेले होते. मात्र अचानक नदीला पूर आल्याने हे 10 ते 11 मजूर तिथेच अडकून पडले. अखेर जिल्हा प्रशासनाने बोटींच्या मदतीने या मजुरांना बाहेर काढले. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरु आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका नागपूर शहर आणि चंद्रपूर जिल्ह्याला बसला आहे. नागपुरात तर अक्षरशः पाण्यातून वाट काढून नागरिकांना चालावं लागत होतं. शाळकरी विद्यार्थ्यांचेही यामुळे मोठे हाल झाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget