एक्स्प्लोर
येत्या 24 तासात विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस- हवामान विभाग

मुंबईः महाराष्ट्रात येत्या 24 तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पाऊस होणार असल्याचं हवामान विभागने सांगितलं आहे. कुलाबा वेधशाळेने मराठवाड्यात येत्या 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर भारतीय हवामान विभागानेही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातही मुसळधार पाऊस होणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. https://twitter.com/IMDWeather/status/752046804758360064
संबंधित बातम्याः
पाहा राज्यात सध्या कुठे-कुठे पाऊस
संततधार पावसाने धरणांच्या पाणी पातळीत वाढ, बळीराजाही सुखावला
मराठवाड्यात येत्या 48 तासांत अतिवृष्टी- हवामान विभाग
आणखी वाचा























