एक्स्प्लोर
Advertisement
वाईच्या प्रसिद्ध गणेश मंदिरात पाणी, साताऱ्यात जोरदार पाऊस
कृष्णा नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रसिद्ध असलेल्या वाईच्या गणपती मंदिरात पाणी आहे.
सातारा: जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने कृष्णा नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रसिद्ध असलेल्या वाईच्या गणपती मंदिरात पाणी आहे. कृष्णा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. काही अतिउत्साही तरुण पुराच्या पाण्यात उतरुन आनंद घेताना दिसत आहेत.
पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यातील सर्व धरणे ओसंडून वाहत आहेत.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोयना, महाबळेश्वर परिसरात तब्बल 100 मिली मीटर पेक्षाही जास्त पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे ओसंडून वाहत आहेत.
आज सकाळी धोम बलकवडी धरणाचे चार दरवाजे उघडल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली. यामुळे वाईचे गणपती मंदिर हळूहळू पाण्यात बुडू लागले आहे.
हवामानाचा अंदाज
आजपासून राज्याच्या बहुतांश भागात दमदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार तर मराठवाडा-विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गेले काही दिवस पावसानं विश्रांती घेतली होती. परंतु सध्या मध्य प्रदेशातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाला मिळाले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
राज्यभरात जोरदार, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement