एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विदर्भात उष्णतेची लाट, तापमान 44 अंशांवर
विदर्भातील अनेक भागात सध्या उष्णतेची लाट पसरायला सुरुवात झाली आहे. ज्याचा सर्वाधिक परिणाम चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जाणवणार आहे.
नागपूर : उष्णतेने होरपळणाऱ्या विदर्भावर आता हिट वेव्हचं संकट घोंगावत आहे. विदर्भातील अनेक भागात सध्या उष्णतेची लाट पसरायला सुरुवात झाली आहे. ज्याचा सर्वाधिक परिणाम चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जाणवणार आहे.
सध्या अमरावती आणि चंद्रपूरचं तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांचाही पारा पुढील दोन ते तीन दिवसांत 45 अंश सेल्सिअसच्या पलिकडे जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
साधारणपणे उष्णतेची लाट टप्प्याटप्प्याने येते. त्यामुळे रविवारपर्यंत विदर्भात उष्णतेची लाट तीव्र झालेली बघायला मिळणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
उष्माघातापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल?
दुपारी 1 ते 3 उन्हात फिरु नका
मासे, मटण, तेलटक पदार्थ, शिळे अन्न खाणं टाळा
मद्यसेवन, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक घेणं टाळा
उन्हातून आल्यानंतर लगेच फ्रीजमधलं पाणी पिऊ नका
तहान नसेल तरीही पुरेसं पाणी प्या
सौम्य रंगाचे, सैल आणि खादीचे कपडे वापरा
बाहेर जाताना गॉगल, छत्री आणि टोपीचा वापर करा
प्रवासात पाणी नेहमी सोबत ठेवा
अशक्त वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
ओआरएस, लस्सी, लिंबू पाणी आणि ताक अशी पेय घ्या
घर थंड राहिल याची काळजी घ्या
रात्री घराच्या खिडक्या नेहमी उघड्या ठेवा
जनावरांचीही काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी जनावरांना सावलीत ठेवा, पुरेसं पाणी द्या
संबंधित बातम्या :
संबंधित बातम्या
अकोला 'हॉट', देशातील सर्वाधिक तापमानाची नोंदउन्हाळ्यात 'अशी' घ्या केसांची काळजी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement