एक्स्प्लोर
मराठवाड्यासह विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटांचा इशारा
विदर्भ आणि मराठवाड्यासाठी पुढचे 3 दिवस जास्त त्रासदायक असणार आहेत. कारण मराठवाड्यासह विदर्भात उष्णतेच्या लाटांचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यासाठी पुढचे 3 दिवस जास्त त्रासदायक असणार आहेत. कारण मराठवाड्यासह विदर्भात उष्णतेच्या लाटांचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भातल्या अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळमध्ये तर मराठवाड्याच्या बहुतांश भागात पुढचे 3 दिवस तापमानात लक्षणीय वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे देशातल्या सर्वात उष्ण शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या अकोला, चंद्रपूर आणि मराठवाड्यातल्या परभणीचाही समावेश झाला आहे. मागच्या 24 तासात याठिकाणी तब्बल 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. स्कायमेटने ही यादी जाहीर केली आहे. पुढचे 3 दिवस हा उकाडा असाच असणार आहे, त्यामुळं नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























