एक्स्प्लोर

Heat Wave : विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता; तळकोकणात 8 जूनला मान्सून दाखल होणार

Heat Wave :  जून महिना सुरू झाला असताना देखील विदर्भात अद्यापही उष्णतेचा तीव्र तडाखा जाणवतोय. विदर्भातील अनेक भागात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.

Heat Wave : वेळेआधीच केरळमध्ये दाखल झालेला मान्सून (monsoon) पुढच्या दोन दिवसांत कोकणात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. परंतु, राज्यात काही ठिकाणी अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. कर्नाटकमधील कारवारमध्येच मान्सून रेंगाळल्यामुळे महाराष्ट्रात मौसमी वारे कधी येणार? असा प्रश्न निर्माण झालाय. असे असतानाच विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभगाने (IMD) वर्तवली आहे. 

जून महिना सुरू झाला असताना देखील अंगाची लाहीलाही होत आहे. विदर्भात अद्यापही उष्णतेचा तीव्र तडाखा जाणवतोय. विदर्भातील अनेक भागात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. दक्षिण महाराष्ट्रात होणाऱ्या पूर्वमौसमी पावसाचा देखील जोर कमी आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातही तापमान चाळीशी पार आहे. त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? असा प्रश्न आता सर्वांना पडलाय. असे असतानाच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

जून महिना सुरू झाल्यानंतर तरी पाऊस पडेल किंवा तापमान कमी होईल असे वाटत होते. पण कालचा दिवस हा नागपूरसाठी अजूनच दाहक ठरला. या सीझनचा तापमानाचा उच्चांक काल नागपुरात नोंदवला गेला आहे. नागपुरात काल 46.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर चंद्रपुरात काल 46.4 तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागपूरकरांना येणारा संपूर्ण आठवडा उष्ण तापमानाला सामोरे जावे लागणार आहे.  

केरळमध्ये  29 मे रोजी मान्सून दाखल झाला आहे. त्यानंतर 31 मे रोजी मान्सून कर्नाटकच्या कारवापर्यंत पोहोचला आहे. परंतु, नैऋत्य वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे मान्सून कर्नाटकातच रेंगाळलाय. तिथे देखील पावसाचा जोर अधिक नसून 7 जून नंतर पावसाचा जोर दक्षिण भारतात वाढेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. 

तळकोकणात मान्सून 8 ते 9 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज आहे. तर मुंबई 12 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. 8 जूननंतर मुंबईत पूर्वमौसमी पावसाचा जोर बघायला मिळेल. मात्र, पुढील आठवड्यात देखील पावसाचा हवा तसा जोर नसणार आहे. राज्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे. 

दक्षिण भारतात 7 जूननंतर  पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. त्यानंतर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. मात्र, नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर कमकुवत असल्यामुळे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाची वाटच बघावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Update : गुडन्यूज! पुढच्या दोन-तीन दिवसांत मान्सून कोकणात; मुंबईत कधी?  

Maharashtra Monsoon Updates : मान्सून रेंगाळला... राज्यात पावसाऐवजी उष्णतेची लाट; मोसमी वाऱ्यांच्या प्रवेशास अडथळा 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget