एक्स्प्लोर
महाराष्ट्रात उष्णतेची लाट, उष्माघाताचे पाच बळी

मुंबई : राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. मराठवाडा आणि विदर्भात सूर्यनारायण अक्षरश: आग ओकत आहे. महाराष्ट्रातल्या 24 जिल्ह्यात तापमान 40 अंशाच्या वर गेलं असून उष्माघातामुळे आतापर्यंत पाच जणांचा जीव गेला आहे. नाशिकमध्ये 40.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे, तर विदर्भातही उष्णतेची लाट पसरली आहे. वाशिम जिल्हा सोडून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये गेल्या दहा वर्षातील मार्च महिन्यातलं सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं आहे. नागपुरात 42 अंश सेल्सिअस तर वर्ध्यात 42.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातही अलर्ट जारी करण्यात आला असून दुपारी 12 ते 3 या दरम्यान नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
उष्माघाताचा दुसरा बळी, धुळ्यात माजी सरपंच महिलेचा मृत्यू
धुळ्यात उष्माघातानं एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बाभुळदे गावात 49 वर्षीय माजी महिला सरपंच मालती निकुंभे यांचा उष्माघातानं मृत्यू झाला. बीडमध्ये राज्यातील उष्माघाताचा पहिला बळी गेला होता. आतापर्यंत उष्णतेनं राज्यात 5 जणांचा बळी घेतला आहे. बुधवारी जगातील दुसऱ्या क्रमांकाचं तापमान असलेल्या रायगडच्या भिरा गावात आज पारा काहीसा उतरला आहे. गुरुवारी भिरा गावात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. भिरातलं तापमान 46.5 अंश सेल्सिअसवर गेलं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून नाशकातील शाळांचा वेळ बदलण्याची शक्यता आहे. दुपार सत्रातील शाळांच्या वेळापत्रकात बदल करुन त्या सकाळ सत्रात भरवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तसंच वाढत्या तापमानामुळं पुढील 72 तास नागरिकांना सावधानतेचा इशाराही प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला आहे.संबंधित बातम्या:
रायगडचा पारा 46.5 अंशांवर, जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक तापमान
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्रिकेट
सोलापूर





















