एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुन्ना यादव आमच्यापेक्षाही फास्ट : नागपूर पोलीस
‘तो आमच्यापेक्षा जास्त फास्ट’ असल्याचं विधान नागपूर पोलिसांनी केलं.
नागपूर : भाजप नेता आणि इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळचा अध्यक्ष मुन्ना यादवच्या प्रकरणात वारंवार टीकेचे धनी ठरणाऱ्या नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा धक्कादायक विधान केलं आहे.
मुन्ना यादवच्या मारहाणीच्या प्रकरणाला 3 महिने उलटल्यानंतरही त्याला अटक करण्यात नागपूर पोलीस अपयशी का, असा प्रश्न विचारल्यानंतर नागपूरचे सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी ‘तो आमच्यापेक्षा जास्त फास्ट’ असल्याचं धक्कादायक विधान केलं.
''आम्ही फरार आरोपींचा नेहमीच शोध घेत असतो. मुन्ना यादवचाही शोध घेत आहोत. मात्र, तो मिळत नाही. आमच्यावर कोणताच राजकीय दबावही नाही'', असंही बोडखे म्हणाले.
दरम्यान, मारहाणीच्या त्या घटनेला तीन महिने झाल्याचा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना तुमचा हिशोब पक्का आहे, असा टोमणाही सह पोलीस आयुक्तांनी मारला. त्यामुळे मुन्ना यादवच्या प्रकरणात नागपूर पोलीस गंभीर नाही, हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
मुन्ना यादवच्या प्रकरणात हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची दखल घेतली होती. मात्र नागपूर पोलिसांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना गांभीर्याने न घेतल्याने पोलीस खरंच मुन्ना यादवला पकडणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
धाराशिव
राजकारण
निवडणूक
Advertisement