एक्स्प्लोर
नांदेड शहर जलमय, महापालिका आयुक्तांच्या घरातही पाणी
नांदेड जिल्ह्यातील 16 पैकी 13 तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, शहरातील सर्वभाग जलमय झाला आहे. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे.
नांदेड : नांदेड जिल्ह्यातल्या 16 पैकी 13 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या घरात देखील 3 ते 4 फूट पाणी शिरलं आहे.
गेल्या २४ तासात नांदेड शहरात तुफान पाऊस सुरु असून, शहरातील सर्वभाग जलमय झाला आहे. आतापर्यंत शहरात १४४ मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस नोंद करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे दत्तनगर, विष्णुनगरसारख्या ठिकाणांमध्ये मोठं पाणी साचलं आहे. यासोबत नांदेडहून मुंबईला जोडणाऱ्या महामार्गावरही पाणी साचल्यानं इथंही वाहनांची गर्दी झाली आहे.
विशेष म्हणजे, नांदेड महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात 3 ते 4 फूट पाणी शिरलं आहे. त्यामुळे आयुक्तांसह शहरातील इतर नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.
दरम्यान, मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरु आहे. गेल्या 24 तासात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 61.72 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
यात औरंगाबादमध्ये 35.47 मिमी, जालना 32.19 मिमी, परभणी 42.21 मिमी, हिंगोली 44.96, नांदेड 100.86, बीड 68.47, लातूर 104.55 मिमी, उस्मानाबाद 65.09 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
क्राईम
Advertisement