एक्स्प्लोर
मुश्रीफांचं नाव न घेतल्याने महाडिकांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांच्या घोषणा
कागलमधील सभेत खासदार धनंजय महाडिक भाषणासाठी उभे राहताच मुश्रीफ गटातील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु करताच महाडिक यांनी आपलं भाषण थांबवलं. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार, हसन मुश्रीफ उपस्थित होते.
कोल्हापूर : कोल्हापुरात राष्ट्रवादीचा परिवर्तन मेळावा सुरु असताना पक्षातील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी भाषणात कागलमधील राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचं नाव न घेतल्यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या नावाने घोषणाबाजी केली.
कागलमधील सभेत खासदार धनंजय महाडिक भाषणासाठी उभे राहताच मुश्रीफ गटातील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु करताच महाडिक यांनी आपलं भाषण थांबवलं. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार, हसन मुश्रीफ उपस्थित होते.
घोषणाबाजी सुरु असताना हसन मुश्रीफांनी माईकचा ताबा घेऊन कार्यकर्त्यांना शांत केलं. तसंच महाडिक यांनाच निवडून आणण्याचं आवाहनही त्यांनी व्यासपीठावरुन केलं. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले आणि महाडिक यांनी भाषणाला पुन्हा सुरुवात केली.
कोल्हापुरात राष्ट्रवादीत असलेली अंतर्गत गटबाजी यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आली. पक्षश्रेष्ठींनी कोल्हापुरातून लोकसभेला पुन्हा धनंजय महाडिकच रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यावेळीही मुश्रीफ समर्थकांचा हिरमोड झाला होता. कार्यकर्त्यांचाच धनंजय महाडिक यांना विरोध असल्याने आगामी निवडणुकीत काय घडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement