Hasan Mushrif: अजितदादांना डिवचण्याचा प्रयत्न होतो, संजय राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तरी मी त्यांचे आज आभार मानले असते; हसन मुश्रीफांची खोचक टीका
सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यास चालढकल होत असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारला घेरलं आहे.

Hasan Mushrif on Sanjay Raut: संजय राऊत यांच्याबद्दल न बोललेलेच बरं असून राऊत यांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तरी मी त्यांचे आज आभार मानले असते, अशी खोचक टीका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी (Hasan Mushrif on Sanjay Raut 2025) केली आहे. सरकारकडून ओला दुष्काळ (Maharashtra flood relief 2025) जाहीर करण्यास चालढकल होत असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारला घेरलं आहे. दुसरीकडे, राऊत यांनी अजित पवार यांच्या गोट्या खेळतोय का? वक्तव्याचा समाचार घेत मग्रूर असल्याची टीका केली होती.
मराठवाड्यावर आलेलं महापुराचे संकट दूर कर
हसन मुश्रीफ म्हणाले की, सुप्रियाताई, संजय राऊत किंवा वडेट्टीवार साहेब हे विरोधी पक्षात आहेत. त्यांचे कामच आहे सरकारला पेचात पकडणे, पण शेतकऱ्यांना शांत करणे आणि शेतकऱ्यांना मदत करणे हे सरकारचं काम आहे ते आम्ही करत आहोत. मुश्रीफ यांनी सांगितले की, गेल्या चार दिवसात अंबाबाईच्या दर्शनाला लाखो भक्त आले आहेत. मी आज दर्शन घेऊन अंबाबाईला प्रार्थना केलीय, मराठवाड्यावर आलेलं महापुराचे संकट दूर कर. पूरग्रस्त नागरिकांचे झालेले नुकसान भरून देण्याची ताकद अंबाबाईने सरकारला द्यावी, अशी प्रार्थना केली असल्याचे ते म्हणाले.
धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा व्हायरल व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा व्हायरल व्हिडिओ पाहून चौफेर टीका होत आहे. याबाबत बोलताना मुश्रीफ (Hasan Mushrif statement on Dharashiv viral video) म्हणाले की, एखादा अधिकारी पार्टीमध्ये सहभागी होत असेल तर ते चुकीचं आहे, पण मला याबद्दल माहिती नाही.जिल्हाधिकारी जर चुकीचे वागत असतील तर याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की घेतील. कालच देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे. महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार मिळून पूरग्रस्तांच्या अपेक्षा पूर्ण करतील. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे, पण कधी करायचं हे ठरलेलं नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील.
इतर महत्वाच्या बातम्या























