Hanuman Jayanti LIVE: आज हनुमान जयंती, ठिकठिकाणी उत्साह, प्रत्येक अपडेट्ससाठी क्लिक करा..
Hanuman Jayanti LIVE: आज हनुमान जयंती, ठिकठिकाणी उत्साह, प्रत्येक अपडेट्ससाठी क्लिक करा..

Background
सूर्याचा घ्यायला गेला घास...
जो वीरांचा आहे खास...
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान... आज हनुमान जयंती... हनुमान जयंती म्हणजे भगवान हनुमान यांचा जन्मोत्सव, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाला हनुमानाचा जन्म झाला अशी आख्यायिका सांगितली जाते...हनुमान जयंती निमित्तानं अंजनेरी गावातील श्री सिद्ध हनुमान मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली... तसच या 11 फुटी मुर्तीला महावस्त्र परिधान करण्यात आलं.. आज पहाटे वाजत - गाजत मिरवणूक काढण्यातही आली. सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी हनुमानाचा जन्म सोहळा उत्साहात पार पडला, आणि भाविकांना दर्शनासाठी मंदीर खुलं करण्यात आलं. दरवर्षी महाराष्ट्रासह (Maharashtra News) इतर राज्यातून भक्तगण दर्शनासाठी मोठ्या संख्येनं अंजनेरीला दाखल होत असतात. जय हनुमानच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमुन गेलाय..
हनुमान जयंती 2023 पूजा शुभ मुहूर्त (Hanuman Jayanti Muhurtha)
सकाळी 06:06 AM ते 07:40 AM
सकाळी 10:49 AM ते 12:23 PM
दुपारी 12:23 PM ते 01:58 PM
दुपारी 01:58 PM ते 03:32 PM
संध्याकाळी 05:07 PM ते 06:41 PM
संध्याकाळी 06:41 PM ते 08:07 PM
सकाळी लवकर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर हनुमानजींच्या समोर बसून त्यांचं ध्यान करा. आता आंब्याच्या पानाने हनुमानजींवर पाणी शिंपडा. हनुमानजींना शेंदूर अर्पण करा. शेंदूर लावल्यानंतर बजरंगबलीला लाल फुलं अर्पण करा. याशिवाय अक्षत, सुपारी, मोतीचूर लाडू, लाल लंगोट अर्पण करा. हनुमान चालिसाचं पठण करा. हनुमानजींना भोग म्हणून खीर अर्पण करा. या दिवशी सुंदरकांड आणि बजरंग बाण अवश्य वाचा. हनुमान मंत्रांचा जप करा आणि हनुमानजींची आरती करा. आता हनुमानजींच्या भोग प्रसादाचं सगळ्यांना वाट करा.
हनुमान जयंती 2023 चं महत्व (Importance of Hanuman Jayanti)
राम भक्तांसाठी हनुमान जयंतीचा (Hanuman Jayanti) दिवस खूप खास असतो. श्री रामाचा भक्त हनुमानजींच्या जयंतीला विधीवत पूजा केली जाते. शहरात, गावांत मोठ मोठ्या मिरवणुका काढल्या जातात. धार्मिक मान्यतेनुसार हनुमानजी हे आपल्या भक्तांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर करतात असा विश्वास आहे. म्हणून हनुमानजींना संकटमोचन म्हटलं जातं.
असं म्हणतात की, जो भक्त हनुमानजीची उपासना करतात ते भय, क्रोध, दु:ख, दोष मुक्त होतो. हनुमानजींची खऱ्या मनाने पूजा केली की आपल्याला दुहेरी म्हणजे रामाची आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते. एक अशी ही मान्यता आहे, म्हणजे शिवपुराणात असं म्हटलं आहे की, संकटमोचन हे भगवान शंकराचा 11वा अवतार आहे.
Pune Hanuman Jayanti : पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यातदेखील हनुमान जयंती साजरी
Pune Hanuman Jayanti : पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यातदेखील हनुमान जयंती साजरी केली जातेय. पोलीस ठाण्यात असलेल्या हनुमान मूर्तीची पोलीस नित्यनेमाणे पूजा करतात.
Gondia Hanuman Jayanthi: गोंदियात झोपलेल्या हनुमानाची मूर्ती
Gondia Hanuman Jayanthi: गोंदियाच्या गौतम नगर परिसरामध्ये झोपलेल्या हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन.























