एक्स्प्लोर
Advertisement
शिवसैनिकांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा : उद्धव ठाकरे
अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी पत्रकार परिषद घेतली.
अहमदनगर : अहमदनगरमधील शिवसैनिकांचे मारेकरी फासावर लटकायला हवेतच. पण सूत्रधार किंवा सुपारी देणारेही फासावर लटकले पाहिजेत. मग ते सत्ताधारी पक्षाचे का असेना, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी फडणवीस सरकारवर पुन्हा निशाणा साधला.
त्याआधी उद्धव ठाकरेंनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. मृत शिवसैनिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 लाख 50 हजार रुपयांची मदत देण्यात आली.
नामर्दाच्या अवलादीला ठेचून काढू!
हल्लेखोर नामर्द आहेत. एकट्याला गाठून, गोळ्या घालून, ते कमी काय म्हणून त्यांचा गळा चिरुन हत्या केली जाते. ह्या नामर्दाच्या अवलादीला ठेचून काढू. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना जाहीर आवाहन करतो की, राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हत्येचा तपास नि:पक्षपातीपणे व्हावा
शिवसेना पक्षप्रमुख पुढे म्हणाले की, "शिवसैनिकांच्या हत्येचा तपास नि:पक्षपातीपणे व्हायला हवा, कारण तपास यंत्रणाही दबावाखाली काम करतं. ज्या शिवसैनिकांनी उद्रेक व्यक्त केला त्या शेकडो जणांवर गुन्हे दाखल केले. पण पोलिस स्टेशनवर हल्ला करुन आरोपीला सोडवणारे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर मात्र गांभीर्याने दखल घेऊन कारवाई झाली नाही. त्यांना अटक झाली, पण कालच त्यांना जामीन मिळाला.
कृष्णप्रकाश आणि उज्ज्वल निकमांची नेमणूक करावी
हत्येचा तपास व्यवस्थित झाला पाहिजे. IPS कृष्णप्रकाश यांच्यासारख्या अधिकाऱ्याची नेमणूक व्हायला हवी. तर या खटल्याचं वकीलपत्र उज्ज्वल निकम यांच्याकडे द्यावं, मी स्वत: निकम यांना कॉल केला आहे, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसंच या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
..तर शिवसैनिकांना कायदा हाती घ्यावा लागेल
एकेकाळी महाराष्ट्र आहे की बिहार असं म्हटलं जायचं. आता नितीश कुमार यांनी बिहारची कायदा सुव्यवस्थित सुरळीत केला असेल. नाईलाजाने वेळ आली तर शिवसैनिकांना कायदा हाती घ्यावा लागेल आणि माता-भगिनींना दिलासा द्यावाच लागेल, असंही ते म्हणाले.
काय आहे प्रकरण?
बिहारलाही लाजवेल असा प्रकार अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान घडला. राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे शनिवारी सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन गुप्तीनेही वार करण्यात आले.
या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली होती. शनिवारी 7 एप्रिलला हे हत्याकांड झालं. त्यानंतर जसे नावं समोर येतील, त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई केली.
एसपी कार्यालयातील तोडफोड प्रकरणी गुन्हे
भाजप आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिजीत कळमकर, आमदार संग्राम जगताप यांचे भाऊ, झेडपी सदस्य सचिन जगताप, नगरसेवक कैलास गिरवले यांच्यासह चार नगरसेवक आणि अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर एसपी कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील अनेकांना अटक करण्यात आली होती.
संबंधित बातम्या :
केडगाव शिवसैनिकांची हत्या प्रकरण : काँग्रेस नगरसेवकाला अटक
अहमदनगर हत्याकांड : 600 शिवसैनिकांवर गुन्हे
UPSC ते शिवसैनिकांच्या हत्येचा आरोपी - संदीप गुंजाळ
शिवसैनिकांची हत्या : राष्ट्रवादीच्या बदनामीचं षडयंत्र : अजित पवार
शिवसैनिकांची हत्या: भाजप आमदार शिवाजी कर्डिले अटकेत
नगरमध्ये तणाव, पालकमंत्री राम शिंदे थीम पार्कच्या उद्घाटनाला
शिवसैनिकांची दुहेरी हत्या, आमदार संग्राम जगतापांना पोलिस कोठडी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement