शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या OBC विद्यार्थ्यांना वर्षाला 60 हजार मिळणार, ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी मोठा निर्णय
Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Scheme : अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जी आर्थिक मदत दिली जाते ती आता ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांनाही देण्यात येणार आहे.
मुंबई : शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या गरीब ओबीसी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. एससी आणि एसटी विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना सुरू आहेत त्याचा लाभ आता उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांनाही लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारने आता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची (Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Scheme) घोषणा केली. सरकारच्या या निर्णयामुळे शहरात राहून उच्च शिक्षण घेण्याऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना दरवर्षी साठ हजार रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे.
शासनाने आज उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना" सुरू केली आहे. त्या माध्यमातून SC आणि ST विद्यार्थ्यांसारख्या आधार योजनेचा लाभ आता OBC विद्यार्थ्यांना ही मिळणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा SC आणि ST वर्गातील विद्यार्थ्यांना आतापर्यंत शासनाकडून शहरात राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी आधार योजनेअंतर्गत रोख मदत मिळायची. मात्र आता शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांनाही आधार योजनेच्या माध्यमातून रोख मदत देण्याचे ठरविले आहे.
राज्याचे इतर मागास आणि बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांची ओबीसी संघटनांसोबत बैठक झाली. त्या बैठकीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे शासनाने त्या संदर्भातला जीआर ही आज काढला आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांची आधार योजना कशी असेल?
- मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी, नवी मुंबई, नागपूर या शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षामागे 60 हजार रु मिळतील.
- संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना 51 हजार रु मिळतील.
- जिल्ह्याच्या ठिकाणी राहून उच्च शिक्षण घेणाऱ्यांना 43 हजार रु मिळतील..
- तालुक्याच्या ठिकाणी राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्याना 38 हजार रु मिळतील.
- या योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून 600 ओबीसी विद्यार्थी आधार योजनेसाठी मेरिट प्रमाणे निवडले जातील.
ही बातमी वाचा: