सदावर्तेंचा पुढील मुक्काम कोल्हापुरात? ताबा घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक मुंबईत, आज अटकपूर्व जामीनावर सुनावणी
Gunratna Sadavarte : छत्रपती घराण्यासंदर्भात आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्तेंना काल (सोमवारी) सातारा सत्र न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Gunratna Sadavarte : छत्रपती घराण्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा मिळवण्यासाठी कोल्हापूर पोलीस प्रयत्नशील आहेत. मात्र तत्पूर्वी सदावर्तेंनी अटकपूर्व जामिनासाठी कोल्हापूर सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आज दुपारी सदावर्तेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. छत्रपती घराण्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं सदावर्तेंवर कोल्हापुरात गुन्हा दाखल झाला आहे.
कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस स्थानकातील पथक सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले असल्याचा माहिती समोर आली होती. मात्र पोलिसांकडून याला कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
छत्रपती घराण्यासंदर्भात आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्तेंना काल (सोमवारी) सातारा सत्र न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्तेंविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं सदावर्तेंना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाकडून सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानं सदावर्तेंची मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, मुंबई, सातारा व्यतिरिक्त सदावर्ते यांच्यावर पुणे, कोल्हापूर, बीड, अकोला या ठिकाणीही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील पोलीस सदावर्तेंचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. सध्या गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे आहे. दरम्यान, ॲडव्होकेट सदावर्तेंना ताब्यात घेण्यासाठी शाहूपुरी पोलिसांचे विशेष पथक रात्री उशिरा मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून याला कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :