दसऱ्याच्या दिवशी मोठी घडामोडी, शिंदे गटाच्या नेत्याची राज ठाकरेंना ऑफर, तुम्ही आमच्यासोबत आल्यास...
संजय राऊत म्हणजे 'हम तो डुबेंगे सनम तुझको भी ले डुबेंगे' अशा पद्धतीचा तो माणूस आहे. बाळासाहेबांची राऊत स्टाईल करायला जातो, ते शब्द बाळासाहेबांच्या मुखातच चांगले वाटतात, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
मुंबई : राज ठाकरेंनी (Raj Thackeray) त्यांच्या पॉडकास्टमधून येणारी निवडणूक ही वचपा काढण्याची असल्याचं सांगत इशारा दिलाय. यानंतर आता गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) त्यांना ऑफर दिलीय. राज ठाकरे आमच्या विचारांशी जोडलेले असून राज ठाकरेंचं मत परखड असतं ते आमच्या सोबत येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
गुलाबराव पाटील म्हणाले, राज ठाकरेंचा विषय त्यांच्या पद्धतीचा असतो, चांगल्याला चांगलं वाईटाला वाईट बोलण्याचा प्रयत्न ते करत असतात. राज ठाकरेंना महाराष्ट्राची चिंता आहे महाराष्ट्रासाठी ते काम करत असतात. आम्हाला खात्री आहे ते आमच्या विचारांशी जोडलेले आहेत. राज ठाकरेंचे मत परखड असतं डावपेच नसतात, त्यांच्या सूचना गांभीर्याने घेऊ... कामांचं मूल्यमापन केलं तर मागच्या सरकारच्या तुलनेत या सरकारने प्रचंड कामं केली अनेक योजना आखल्या जनता हुशार आहे ती आम्हालाच मत देईल. राज ठाकरेही आमच्यासोबत येतील. राज ठाकरेंची महाराष्ट्राला गरज आहे, आमच्या सोबत आल्यास आम्ही नक्कीच त्याचं स्वागत करू
शिवसेना प्रमुखांचा दसरा मेळावा हा आमच्यासाठी परवणी होती. इथं लोकलंने येऊन सार्वजनिक शौचालयात अंघोळ करून साहेबांच्या विचारांचे सोने लुटून वर्षभर त्या विचारांची अंमलबजावणी करायचो. ही आठवण आम्ही कधीही विसरू शकणार नाही. आज आम्ही जे आहोत ते बाळासाहेबांमुळे आहेत. उणीव आहे त्यांची साहेबांनी कधी जात पाहिली नाही, पंत पहिला नाही. किती पैसे आहेत ते विचारले नाहीत त्याचं काम पाहून त्याला संधी दिली. त्यामुळेच अनेक जण आमदार खासदार, मंत्री, नगरसेवक झाले. माझे जन्म देणारे वडिल जरी दुसरे असले तरी राजकीय जन्म हा बाळासाहेबांनीच दिला, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
संजय राऊत म्हणजे 'हम तो डुबेंगे सनम तुझको भी ले डुबेंगे : गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊत स्वत:ला काय समजतात हेच कळत नाही, बाळासाहेबांची अॅक्टिंग करतात , मफलर इथे तिथे फिरवतात काय, गालावर हात ठेवतात काय? उद्धव साहेबांनंतर त्यांचाच नंबर आहे असं त्यांना वाटू लागलं आहे. कधी ते ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडून आले नाही. काय तर फक्त भाषण चांगलं करतात, पण या लोकांमुळेच ही संघटना गेली.
गद्दार हा त्यांचा कॉमन शब्द आहेय. संजय राऊत म्हणजे 'हम तो डुबेंगे सनम तुझको भी ले डुबेंगे' अशा पद्धतीचा तो माणूस आहे. बाळासाहेबांची राऊत स्टाईल करायला जातो, ते शब्द बाळासाहेबांच्या मुखातच चांगले वाटतात. हे कोण होते, कसे वर आले, कोणाच्या मतांवर खासदार झाले हेही सांगा...
हे ही वाचा :