एक्स्प्लोर
Advertisement
कोणी दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 'फिटनेस चॅलेंज'?
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिटनेस चॅलेज दिलं आहे
मुंबई : केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी सुरु केलेल्या फिटनेस चॅलेंज मोहिमेनंतर देशभरात 'व्यायामाच्या व्हिडिओं'चं वारं वाहू लागलं आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही फिटनेस चॅलेंज मिळालं आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी फडणवीसांना फिटनेस चॅलेज दिलं आहे. व्यायाम करतानाचा व्हिडीओ ट्विट करत रुपानींनी हे आव्हान दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांना आपला व्यायाम करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुन आणखी एका व्यक्तीला फिटनेस चॅलेंज द्यावं लागेल.
काय आहे फिटनेस चॅलेंज? राज्यवर्धन सिंह राठोड यांनी देशात फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडियाचा अनोख्या पद्धतीने आधार घेतला. राठोड यांनी व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करुन अभिनेता हृतिक रोशन, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल यांना आव्हान दिलं होतं. राज्यवर्धन राठोड यांनी नागरिकांना व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सांगितलं आहे. त्यानंतर आणखी काही जणांना नॉमिनेट करत फिटनेस चॅलेंज देण्यास सांगितलं आहे. अशाप्रकारे ही फिटनेस मोहिमेची साखळी सुरु राहील.Excellent initiative by Shri @Ra_THORe Ji. I am posting my #HumFitTohIndiaFit video & further extend #FitnessChallenge to Maharashtra Chief Minister Shri @Dev_Fadnavis Ji pic.twitter.com/kXxUaHuhZp
— Vijay Rupani (@vijayrupanibjp) June 1, 2018
विराटचं चॅलेंज मोदींनी स्वीकारलं, तर अनुष्काने पूर्ण केलं!
पंतप्रधान रात्रंदिवस काम करतात. संपूर्ण देश फिट व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आपल्या कामात व्यायामाचा समावेश करण्यासाठी राठोड यांनी हा उपक्रम सुरु केला. राठोड यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते स्वत:च्या कार्यालयातच पुश अप्स करताना दिसत आहेत. राठोड यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना फिटनेसबाबत जागरुक करताना 'हम फिट तो इंडिया फिट' हा नाराही दिला. राज्यवर्धन राठोड यांनी 2004 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी नेमबाजीत रौप्यपदकही मिळवलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अशाप्रकारची मोहीम सुरु झाल्याने त्याचा नक्कीच प्रभाव पडू शकतो.राज्यवर्धन सिंह राठोड यांचं सायना, विराट, हृतिकला चॅलेंज
विराट कोहली, हृतिक रोशन, सायना नेहवाल, बबिता कुमारी यांच्यासह अनेक राजकीय नेते, खेळाडू आणि सेलिब्रिटीज राठोड यांच्या या मोहीमेत सहभाग नोंदवत आहेत. विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकारी महेंद्रसिंह धोनीना नॉमिनेट केलं होतं. अनुष्का शर्माने चॅलेंज स्वीकारुन ते पूर्णही केलं. आवडीचा व्यायाम करुन तिने फिटनेस चॅलेंजचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. यानंतर तिने अभिनेता वरुण धवन आणि स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकलला चॅलेंज दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोंदींनीही विराटचं आव्हान स्वीकारलं. लवकरच व्यायामाचा व्हिडीओ पोस्ट करणार असल्याचं ट्वीट त्यांनी केलं आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement