एक्स्प्लोर

शिक्षण विभागाकडून ऑनलाईन शिक्षणासाठी गाईडलाइन्स तयार; विद्यार्थ्यांचे वय, मानसिकता विचारात घेणार

शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षणासाठी गाईडलान्स तयार केल्या आहेत. शिक्षण विभागाकडून तयार करण्यात येणाऱ्या सूचनांप्रमाणे पूर्व प्राथमिक, पहिली व दुसरीच्या इयत्तांसाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करण्यात येऊ नये, असं सांगण्यात आले आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा व महाविद्यालये सुरु करता येणार नसल्याने नवं शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली, ऑनलाईन पद्धतीने सुरु करणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. शाळांनी सुरु केलेल्या ऑनलाईन वर्गाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर होऊ नये, यासाठी काही गाईडलाईन्स शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप या सूचनांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून त्यांची परवानगी मिळाल्यानंतर हे निर्देश शाळा व इतर शैक्षणिक संस्थांना जारी करण्यात येणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

शिक्षण विभागाकडून तयार करण्यात येणाऱ्या सूचनांप्रमाणे पूर्व प्राथमिक, पहिली व दुसरीच्या इयत्तांसाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करण्यात येऊ नये, असं सांगण्यात आले आहे. तिसरी ते पाचवीच्या इयत्तेसाठी रोज एक तास ऑनलाईन वर्ग शाळांना घेता येणार आहेत. सहावी ते आठवीसाठी रोज दोन तास तर नववी ते बारावीसाठीच्या विद्यार्थ्यांना रोज किमान तीन तास ऑनलाईन वर्ग घेतले जाऊ शकणार आहे. या डिजिटल लर्निंगच्या प्रक्रियेमध्ये आवश्यकतेनुसार ब्रेक देण्यात यावा आणि सलग शिकवण्या घेण्यात येऊ नये, असे यामध्ये सुचवण्यात आले आहे.

सतत ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग घेतल्याने त्याचा दुषपरिणाम विद्यार्थ्यांवर होत, असल्याच्या विविध भागातून अनेक पालकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील काही काळात शैक्षणिक संस्थांकडून ऑनलाईन वर्ग घेताना त्यासाठी शाळांना मार्गदर्शन तत्वे ठरवून देण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून देण्यात आली आहे. कुठल्या वर्गासाठी किती तास ऑनलाईन शिक्षण संस्थेकडून/शाळेकडून घेण्यात यावे यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून परवानगी मिळाल्यानंतर यासंदर्भातील सूचना दिल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 'गेल्या काही दिवसांत शाळा बंद शिक्षण सुरू हा उपक्रम अनेक शाळांमध्ये सुरू झाल्यानंतर आता ऑनलाईन शिक्षणाचे प्रस्थ वाढले आहे. मात्र हे सारे करत असताना टप्प्याटप्प्याने सुरुवात करायला हवी. मुलांच्या वयाप्रमाणे त्यांना किती वेळ ऑनलाईन बसवले गेले पाहिजे? त्यासाठी काय मानद प्रणाली हवी यासंदर्भात गाव, जिल्हा पातळीवरून आणि तज्ज्ञांकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. याच सूचनांच्या आधारावर शिक्षण विभागाकडून SOP तयार केल्या जात आहेत. शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी पालक आणि शिक्षणमंत्री म्हणून घेणे माझी जबाबदारी आहे', अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. यासंदर्भात केंद्रप्रमुख, शाळांचे मुख्याध्यापक, पालक, लोकप्रतिनिधी, मानसोपचारतज्ज्ञ, समाजसेवक या सगळ्यांशी चर्चा करून ऑनलाईन लेक्चर्स किती वेळ घ्यावेत? मध्ये किती ब्रेक द्यावा? कोणत्या पद्धतीने घ्यावेत यासाठीच्या सूचना तयार करण्यात आल्याची माहिती ही त्यांनी दिली.

Final Year Exam | अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्या, पुण्यातील शिक्षण संस्थांची मागणी

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget