एक्स्प्लोर
गुहागरमध्ये गव्यांची 6 तास झुंज, शिंगं अडकून दोन्ही गव्यांचा मृत्यू

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यातील अंजनवेल गावाजवळ गव्यांच्या झुंजीत दोन्ही गव्यांचा मृत्यू झाला. गावाजवळ दोन गव्यांची झुंज लागली होती. या झुंजीत दोन्ही गव्यांची शिंगं एकमेकांच्या शिंगात अडकली होती. जवळपास 6 तास ही झुंज सुरु होती. या झुंजीत दोन्ही गवे गंभीर जखमी झाले होते. दोन्ही गव्यांची शिंग एकमेंकांच्या शिंगात अडकल्यानं दोघांपैकी एकालही माघार घेता येत नव्हती. स्थानिकांनी ही झुंज सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही आक्रमक झाल्यानं झुंज काही सुटली नाही. अखेर गंभीर जखमी झालेले दोन्ही गव्यांच्या जागीच तडफडून मृत्यू झाला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
ठाणे
महाराष्ट्र























