एक्स्प्लोर
उपराष्ट्रपतींना कचरा दिसू नये म्हणून पुण्यात रस्त्यालगत पडदे
पुणे : उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी रस्त्यावरील कचऱ्याचं ओंगळवाण दर्शन होऊ नये म्हणून हिरवे पडदे लावण्यात आले आहेत. पुण्यातील खडकवासल्यात आज उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांचा दौरा होता. या दोन्ही व्हीव्हीआयपींना रस्त्यावरील कचरा दिसू नये म्हणून हिरवे पडदे लावण्यात आले.
गांधी जयंतीनिमित्त नुकतंच पुण्यात स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आलं. त्यातंच आज एकाच दिवशी दोन व्हीव्हीआयपींचे दौरे असल्यामुळे प्रशासनाकडून रस्त्यालगतचा कचरा झाकण्यासाठी दोन्ही बाजूंना हिरव्या रंगाचे पडदे लावण्यात आल्याच चित्र समोर आलं आहे.
पुण्यात राबवण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानात खासदार अनिल शिरोळे आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरही सहभागी झाले होते. स्वच्छता अभियानानंतर दोनच दिवसात पुण्यातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग दिसू लागल्याने स्वच्छ भारत मोहिम एका दिवसापुरतीच होती का असा सवालही नागरिकांकडून विचारला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
क्राईम
राजकारण
Advertisement