Gram Panchayat Election Voting Live Updates : राज्यातील विविध जिल्ह्यांतील 1079 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान
राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी आज (16 ऑक्टोबर 2022) मतदान (Maharashtra Gram Panchayat Election) होणार आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमध्ये मतदान होणार आहे.
LIVE
Background
Gram Panchayat Election Voting Live updates : राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी आज (16 ऑक्टोबर 2022) मतदान (Maharashtra Gram Panchayat Election) होणार आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी (Sarpancha) आज मतदान होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतादानाला सुरुवात होणार आहे. तर सायंकाळी पाच पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. सर्व ठिकाणी मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.
या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान
राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. मतदान होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आज होणारी ग्रामपंचायत निवडणूक ही महत्त्वाची आहे. कारण या सर्व ग्रामपंचायतीसाठी सरपंचाची निवडणूक (Sarpanch Election) ही थेट जनतेमधून होणार आहे. या निवडणुकीचा निकाल सोमवारी (17 ऑक्टोबर) लागणार आहे.
सोमवारी होणार मतमोजणी
1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होणार आहे. तर सोमवारी (17 ऑक्टोबर) मतमोजणी होणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होणार आहे. आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त भागात दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे.
अकोला पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक
अकोला जिल्ह्यातील सातही पंचायत समिती सभापतीपदासाठी आणि उपसभापती पदाची निवडणूक होत आहे. सातही पंचायत समित्यांवर वंचित बहुजन आघाडीचा वरचष्मा आहे. मात्र, वंचितचे पुर्ण बहूमत असलेल्या सर्वात मोठ्या अकोला पंचायत समितीत भाजपला लॉटरी लागती. कारण एसटी महिला राखीव उमेदवार त्यांच्याकडेच आहे. याशिवाय आज वेळेवर काही नवी समिकरणं उदयास येतात का? हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे.
Gram Panchayat Election: विविध जिल्ह्यांतील 1079 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान
विविध 18 जिल्ह्यांमधील 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या; तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात 1 हजार 79 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 64.83 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी उद्या (ता. 17 ऑक्टोबर) मतमोजणी होईल. मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 134, पालघर- 336, रायगड- 16, रत्नागिरी- 36, सिंधुदुर्ग- 4, नाशिक- 187, नंदुरबार- 200, पुणे- 1, सातारा- 4, कोल्हापूर- 3, अमरावती- 1, वाशीम- 1, नागपूर- 15, वर्धा- 9, चंद्रपूर- 92, भंडारा- 19, गोंदिया- 5 आणि गडचिरोली- 16. एकूण- 1079.
ठाणे जिल्हा ग्रामपंचायत मतदान अपडेट
ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतसाठी सायंकाळ पर्यंत साधारणपणे ७५-८०% मतदान झाल्याचा अंदाज आहे. शहापूर तालुका वगळता इतर ठिकाणच्या मतदान केंद्रातील टीम मतमोजणी केंद्रावर पोहोचल्या आहेत. शहापूरमधील मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपल्याच्या वेळी रांगेत नागरिक उभे होते. या सर्व नागरिकांचे मतदान पूर्ण होण्यास सुमारे सायंकाळचे ७.३० वाजले. त्यामुळे तेथील टीम या मतमोजणी केंद्रापर्यंत अद्यापपर्यंत पोहोचल्या नव्हत्या. या कारणामुळे जिल्ह्यातील संपूर्ण अंतिम आकडेवारी येण्यास उशीर होणार आहे.
अकोल्याचे तहसीलदार सुनील पाटील यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
अकोल्याचे तहसीलदार सुनील पाटील यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न. तीन दिवसांपुर्वीच्या घटनेचा व्हिडीओ 'माझा'च्या हाती. अकोला तालूक्यातील उगवा गावातील घटना. मोर्णा नदीत सुरू असलेल्या रेती चोरीवर कारवाईसाठी तहसीलदार पाटील गेले होते दुचाकीने. तहसीलदारांच्या तक्रारीवरून चारजणांवर अकोल्यातील अकोटफैल पोलिसांत गुन्हा दाखल.
मुख्यमंत्र्यांकडून कारशेडबाबतच्या चर्चेसाठी बुधवारी बैठक
मुख्यमंत्र्यांकडून कारशेडबाबतच्या चर्चेसाठी बुधवारी बैठक
मोगरपाडा, कांजुरमार्ग आणि राई, मुर्धे येथील कारशेडसंदर्भात सह्याद्री अतिथिगृहात बैठकीचं आयोजन
उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव- महसूल, महानगर आयुक्त एमएमआरडीए, ठाणे जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना निमंत्रण
चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शक मनवा नाईक सोबत गैरवर्तन करणाऱ्या कॅब चालकाला पोलिसांनी केली अटक
चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शक मनवा नाईक सोबत गैरवर्तन करणाऱ्या कॅब चालकाला पोलिसांनी केली अटक
बीकेसी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात दाखल करण्यात आला आहे गुन्हा
आरोपी कॅब चालकाची गाडी ही पोलिसांनी केली जप्त
अभिनेत्रीचा आरोप आहे की, जेव्हा ती टॅक्सीने घरी जात होती, तेव्हा कॅब चालकाने तिच्याशी गैरवर्तन केले आणि धमकी दिली होती
मनवा नाईकने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे
शनिवारी संध्याकाळी घडली होती घटना
ही गोष्ट त्यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे शेअर केली होती
अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देताना, मुंबईचे सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी कॅब चालकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते आश्वासन
मात्र या प्रकरणात पोलीसानी तवरीत कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत