एक्स्प्लोर
राज्यातील तरुणांना सरकारचं न्यू ईयर गिफ्ट, हजारो पदांसाठी भरती
पश्चिम रेल्वेमध्ये 3553 अप्रेंटिस पदांची, नाबार्डमध्ये ऑफिस अटेंन्डट पदाच्या 73 जागा, भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपीक पदाच्या महाराष्ट्रात 865 जागा भरल्या जाणार आहेत.
मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील तरुणांना आनंदाची बातमी आहे. नुकतंच स्थापन झालेल्या ठाकरे सरकारने विविध सरकारी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात विविध हजारो पदांसाठी भरती होणार आहे. पश्चिम रेल्वेमध्ये 3553 अप्रेंटिस पदांची, नाबार्डमध्ये ऑफिस अटेंन्डट पदाच्या 73 जागा, भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपीक पदाच्या महाराष्ट्रात 865 जागा भरल्या जाणार आहेत.
याबाबतची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे. शिवाय महाराष्ट्र सरकारच्या https://www.mahanews.gov.in/HOME/NaukriShodhaNewsDetails.aspx?str=0ur4SZfbPVM= या संकेतस्थळावरही ही माहिती उपलब्ध आहे.
पश्चिम रेल्वेमध्ये ३५५३ अप्रेंटिस पदांची भरती
पदाचे नाव : अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण, संबंधित आय.टी.आय ट्रेड मध्ये उत्तीर्ण
वयाची अट : ०६ फेब्रुवारी २०२० रोजी १५-२४ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याचा कालावधी : ०७ जानेवारी २०२० (११:०० पासून) - ०६ फेब्रुवारी २०२० (१७:०० वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/39MhTvd
ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डामध्ये ट्रेड अप्रेंटिस ६०६० पदांची भरती, महाराष्ट्रात : १९०८ जागा
पदाचे नाव : नॉन आय.टी.आय अप्रेंटिस
- शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि गणित व विज्ञान विषयात किमान ४० टक्के
- पदाचे नाव : आय.टी.आय अप्रेंटिस शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १० वी आणि आयटीआय ट्रेड (एनसीव्हीटी ) मध्ये उत्तीर्ण
- वयोमर्यादा : ०९ फेब्रुवारी २०२० रोजी १५ ते २४ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०९ फेब्रुवारी २०२० (११.५९ पर्यंत)
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/37useKr
ऑनलाईन अर्जास १० जानेवारी २०२० पासून सुरूवात : http://bit.ly/2ZK39sk
----------
भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपीक पदाच्या ८३०८ जागा (महाराष्ट्रात ८६५ जागा)
- पदाचे नाव : ज्युनिअर असोसिएट (क्लर्क) (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स)
- शैक्षणिक पात्रता : पदवीधर/ पदवीच्या अंतिम वर्षाला असलेले उमेदवार
- वयोमर्यादा : ०१ जानेवारी २०२० रोजी २० ते २८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ जानेवारी २०२०
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/37xX19i
ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2QiDqE8
----------
जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट मध्ये विविध पदांची भरती
- मुख्य व्यवस्थापक : १ जागा
- शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी/ एमबीए किंवा यासमान मान्यता असलेली शैक्षणिक पात्रता आणि १० वर्षे अनुभव
- वरिष्ठ व्यवस्थापक : १ जागा
- शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी/ एमबीए किंवा यासमान मान्यता असलेली शैक्षणिक पात्रता आणि ७ वर्षे अनुभव
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापक (पी आणि आय आर), जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट, प्रशासकीय इमारत, शेवा, नवी मुंबई ४००७०७
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2rNJNpH
----------
भारतीय रिझर्व्ह बँक सर्विसेस् बोर्ड मुंबई येथे विविध १७ पदांची भरती
- कायदा अधिकारी ग्रेड बी : १ जागा
- व्यवस्थापक (तांत्रिक-स्थापत्य) : २ जागा
- सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा) : ८ जागा
- सहाय्यक व्यवस्थापक (शिष्टाचार आणि सुरक्षा) : ५ जागा
- ग्रंथपाल व्यावसायिक (सहाय्य ग्रंथपाल) ग्रेड ए : १ जागा
- अर्ज करण्याचा कालावधी : 30 डिसेंबर २०१९ ते २० जानेवारी २०२०
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/350CecU
----------
नाबार्डमध्ये ऑफिस अटेंन्डट पदाच्या ७३ जागा
- पदाचे नाव : ऑफिस अटेंन्डट
- महाराष्ट्रात : २३ जागा
- शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
- वयाची अट : ०१/१२/२०१९ रोजी ३० वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : १२ जानेवारी २०२०
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2PXXk7r
ऑनलाईन अर्जासाठी : https://bit.ly/39d2Bzh
----------
भारतीय संसदेत संसदीय पत्रकार पदाच्या २१ जागांची भरती
- संसदीय पत्रकार : २१ जागा (१२ इंग्रजीसाठी ९ हिंदीसाठी)
- शैक्षणिक पात्रता : पदवीधर आणि शाँर्टहँड इंग्रजी/हिंदी मध्ये १६० शब्द प्रतिमिनिट गती
- वयोमर्यादा : २८ जानेवारी २०२० रोजी ४० वर्ष (मागासवर्गीय उमेदवार/शासकीय कर्मचाऱ्यांना सवलत)
- अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : २८ जानेवारी २०२०
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : द रिक्रुटमेंट ब्रँच, लोकसभा सचिवालय, रुम नं. ५२१, संसद भवन ॲनेक्स, नवी दिल्ली – ११० ००१
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2PNBd3p
----------
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्वपरीक्षा - २०२०
सहायक राज्यकर आयुक्त, गट-अ : १० जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
उपमुख्य कार्यकारी अधिकारी / गटविकास अधिकारी, गट-अ : ७ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
सहायक आयुक्त / प्रकल्प अधिकारी, श्रेणी – २, गट-अ : १ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
उद्योग उप संचालक, तांत्रिक, गट- अ : १ जागा
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य शाखेतील अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान
सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट- अ : २ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट - ब, (प्रशासन शाखा) : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
कक्ष अधिकारी, गट – ब : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
सहायक गट विकास अधिकारी, गट-ब : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
सहायक निबंधक सहकारी संस्था, गट- ब : १९ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
उप अधीक्षक, भूमी अभिलेख, गट- ब : ६जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब : ३ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान.
तसेच उंची : पुरूष : १६५ सें.मी. किमान, स्त्री : १५५ सें.मी. किमान (अनवाणी)
छाती : न फुगविता ७९ सें.मी., फुगविण्याची क्षमता : किमान ५ सें.मी.
सहायक आयुक्त राज्य उत्पादक शुल्क, गट-ब : १ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट- ब : ४ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
सहायक प्रकल्प अधिकारी/संशोधन अधिकारी व तत्सम, गट- ब : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
नायब तहसिलदार, गट-ब, : ७३ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
वयोमर्यादा : दि. १ एप्रिल २०२० रोजी वय वर्ष १९ ते ३८ (मागासवर्गीय /अनाथ /खेळाडू/माजी सैनिक/दिव्यांग उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १३ जानेवारी २०२०
अधिक माहितीसाठी :- http://bit.ly/2PNKFDO
ऑनलाईन अर्जासाठी :- http://bit.ly/2QbjkKJ
----------
मध्य रेल्वे (मुंबई) मध्ये विविध २५१ पदांची भरती
कनिष्ठ लिपिक : १७१ जागा
शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग ३० प्र.श.मि. तसेच हिंदी टायपिंग २५ प्र.श.मि ( मागासवर्गीय उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेत सवलत)
वरिष्ठ लिपिक : ८० जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष
वयोमर्यादा : ४२ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १९ जानेवारी २०२० (०६.०० वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2EBnIxj
ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2PH9z88
----------
नागपूर भारतीय डाक विभागात विविध पदांच्या ५ जागांची भरती
डिस्पॅच रायडर : १ जागा
- शैक्षणिक पात्रता : ८ वी पास, दुचाकी, तीनचाकी आणि हलके चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना
- वयोमर्यादा : १ जुलै २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2EBw1Jm
पेंटर (स्किल्ड आर्टिसन) : १ जागा
- शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात शासनमान्य तंत्रज्ञान संस्थेचे प्रमाणपत्र किंवा ८ वी पास आणि संबंधित क्षेत्रातील १ वर्षांचा अनुभव
- वयोमर्यादा : १ जुलै २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
- अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2SaWl51
स्टाफ कार ड्रायवर : ३ जागा
- शैक्षणिक पात्रता : १० वी पास, हलके व जड वाहन चालवण्याचा परवाना आणि अनुभव
- वयोमर्यादा : १५ जानेवारी २०२० रोजी १८ ते २७ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
- अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2S82IpT
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जानेवारी २०२० (५ वाजेपर्यंत)
अर्ज करण्यासाठी : http://bit.ly/2Z6n18G
----------
कोल इंडिया लिमिटेड मध्ये विविध १३२६ पदांची भरती
- मॅनेजमेंट ट्रेनी
- मायनिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल : ८३२ जागा
- शैक्षणिक पात्रता : ६० टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअर उत्तीर्ण
- कोल प्रिपरेशन : २८ जागा
- शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअर (केमिकल / मिनरल) उत्तीर्ण
- सिस्टम : ४६ जागा
- शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअर (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनिअर /आय.टी ) / एम.सी.ए उत्तीर्ण
- मटेरियल मॅनेजमेंट : २८ जागा
- शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअर, ०२ वर्षाचा एम.बी.ए / पी.जी डिप्लोमा मॅनेजमेंट उत्तीर्ण
- फायनांस आणि अकाउंट्स : २५४ जागा
- शैक्षणिक पात्रता : सी.ए / आयसीडब्ल्यूए उत्तीर्ण
- पर्सेनल आणि एचआर : ८९ जागा
- शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी /डिप्लोमा मॅनेजमेंट (एच.आर/ इन्डस्ट्रीअल रिलेशन) किंवा एम.एच.आर.ओ.डी किंवा एम.बी.ए किंवा एम.एस.डब्ल्यू (एच.आर) उत्तीर्ण
- मार्केटिंग आणि सेल्स : २३ जागा
- शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह एम.बी.ए / पी.जी डिप्लोमा मॅनेजमेंट (मार्कटिंग) मध्ये उत्तीर्ण
- कम्युनिटी डेव्हलपमेंट : २६ जागा
- शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी / पदविका उत्तीर्ण
- वयोमर्यादा : ०१.०४.२०२० रोजी ३० वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : १९ जानेवारी २०२० (रात्री ११.०० वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/38QYBo3
ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/36LFhqp
----------
खादी व ग्रामोद्योग आयोगामध्ये यंग प्रोफेशनल्स् पदांच्या ७५ जागा
- पद : यंग प्रोफेशनल्स्
- शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण
- वयोमर्यादा : दिनांक १० जानेवारी २०२० रोजी उमेदवाराचे वय २७ वर्षापेक्षा जास्त नसावे
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० जानेवारी २०२०
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/345jPer
अर्ज करण्यासाठी : http://bit.ly/3475rCi
----------
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची भरती
- पदाचे नाव : कनिष्ठ विभाग लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहायक, पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर
- शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० जानेवारी २०२०
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2Pfvwdb
अर्ज करण्यासाठी : http://bit.ly/2ONkug9
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
बातम्या
बातम्या
Advertisement