एक्स्प्लोर
Advertisement
'तुकाराम मुंढेंचा स्वभाव अहंकारी'
मुंबई: नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे राज्यातील एक वादग्रस्त अधिकारी ठरले आहेत. या आधी ज्या जिल्ह्यात त्यांनी काम केलं तिथल्या पालकमंत्र्यांनी किंवा राज्यातील इतर मंत्र्यांनी त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. आता नवी मुंबई पालिकेत त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आल्यामुळे आणि त्यांचं पुढे काय होणार हा निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्यामुळे, मंत्रालायतही मुंढेबाबत चर्चेचं गुऱ्हाळ सुरु आहे.
तुकाराम मुंढे सक्षम अधिकारी आहेत, कर्तव्यात कसूर करत नाहीत, हे मंत्र्यांनाही वाटतं, पण त्याचं वागणं अनेकांना खटकतं.
लोकप्रतिनिधींचाही मान असतो, प्रत्येकवेळी गोष्टी ताणण्याची गरज नसते, असं काहींचं म्हणणं आहे.
तर अधिकाऱ्यांनी दरवेळी कारवाईचा बडगा न उगारता मध्यम मार्गही काढता येऊ शकतो. मुंढेंचा स्वभाव अहंकारी आहे, असं काहींचं मत आहे.
तुकाराम मुंढेंचं वागणं व्यवहार्य नाही, असा सूर मंत्र्यांमध्ये दिसून येतो.
तुकाराम मुंढे आणि वाद
तुकाराम मुंढे हे सोलापूरचे जिल्हाधिकारी होते, त्यावेळी त्यांनी पालकमंत्री विजय देशमुख यांना इंगा दाखवला होता. तर वारीच्या वेळी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची अडवणूक केली होती. यामुळे त्या त्या वेळी वाद झाले.
विधानसभा अधिवेशनात तर अजित पावरांनीच मुंढेंवर जोरदार टीका केली होती. मुंढे हे अधिकारी- मंत्र्यांना मान देत नाही, ऐकत नाहीत, असं अजित पवार म्हणाले होते.
मात्र मुख्यमंत्री मुंढेंच्या पाठिशी उभं राहिल्याचं चित्र होतं. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी तुकाराम मुंढेंकडे दिली.
मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील असलेल्या मुंढेंचा फटका भाजपलाही बसला. त्यामुळे त्यांच्याविरोधात सर्वात आधी भाजप आमदार आमदार मंदा म्हात्रे यांनी आवाज उठवला.
तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव
तुकाराम मुंढेंविरोधात नवी मुंबई महापालिकेत अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने ठरावाच्या बाजूने, तर एकट्या भाजपने मुंढेंच्या बाजूने मतदान केलं.
आता या प्रकरणी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे. खरं तर मुख्यमंत्री नेहमीच मुंढेंना पाठिंबा देत आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री भाजप नगरसेवकांनी केलेल्या मतदानाच्या बाजूने निर्णय घेतात की ठरावाच्या बाजूने याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या
आयुक्त तुकाराम मुंढेंची तात्काळ बदली होणार नाही: सूत्र रिझल्ट देणं माझं काम : तुकाराम मुंढेतुकाराम मुंढेंच्या Exclusive मुलाखतीतील 10 मुद्दे
आयुक्त तुकाराम मुंढेविरोधात अविश्वास ठराव मंजूर आरोपांबाबत मला बोलण्याची संधीच मिळाली नाहीः तुकाराम मुंढे राष्ट्रवादी काँग्रेसने हाकलेले कर्तव्यनिष्ठ आयएएस अधिकारीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement