एक्स्प्लोर
Advertisement

औरंगाबादमधील गुंडगिरीमुळे 'हमदर्द' कंपनीला 'दर्द'
हमदर्द कंपनीने औरंगाबाद येथे कारखाना उभारण्यासाठी आवश्यक असलेली बहुतांश रक्कम वितरित केली आहे. आतापर्यंत 150 कोटीं खर्च केलेत.

औरंगाबाद : राज्यात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मोठे उद्योग यावेत, यासाठी कायम प्रयत्न केले जातात. मात्र आलेल्या उद्योगांना स्थानिकांच्या कटकटीमुळे गुंतवणूक करावी की नाही, असा प्रश्न पडत आहे. औरंगाबाद येथे सुरु होत असलेली 'हमदर्द' कंपनीचा 500 कोटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प स्थानिकांच्या अडचणीमुळे सुरु होण्याआधीच बंद करण्याच्या विचारात आहे.
'मॅग्नेटिक महाराष्ट्र'अंतर्गत औरंगाबाद येथील शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये हमदर्द कंपनीचा कारखाना उभारण्याचा सामंजस्य करार झाला. कंपनीने कारखान्याला आवश्यक असलेल्या औषधी वनस्पतींच्या शेतीसाठी 200-300 एकर जागेची आवश्यकता होती. त्यासाठी हमदर्द कंपनीने पैठण आणि गंगापूर या दोन तालुक्यांमध्ये जमीन खरेदी केली. त्या ठिकाणी जमिनीला वॉल कंपाऊंड बांधण्यास सुरुवात केली. दुसरीकडे एमायडीसीतला उद्योग उभारणी सुरु होती. मात्र त्यातच गंगापूर तालुक्यातील कंपनीला गुंडांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप 'हमदर्द'ने केला आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये गुंतवणूक करावी की नाही, या विचारात हमदर्द कंपनी पडली आहे.
हमदर्द कंपनीने गंगापूरमध्ये 200 एकर जागा घेतली. गेल्या काही दिवसात इथे काही लोकांनी त्यात जमिनीवरती हक्क दाखवत 'हमदर्द'ला तिथे काम करण्यास मज्जाव केला. न्यायालयाचे एक पत्र देखील हमदर्दच्या हातात सोपवलं. औरंगाबादेतील आलेल्या अनुभवाला वाचा फोडण्यासाठी 'हमदर्द'तर्फे उद्योग सहसंचालक, एमआयडीसीचे विभगीय अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. हे उत्पादन करण्यासाठीच अडचणी येत असतील, तर तिथे प्रॉडक्ट कसं तयार होणार? त्यामुळे हमदर्द कंपनीने औरंगाबाद येथील त्यांच्या प्रकल्पाचं काम थांबवलं आहे.
हमदर्द कंपनीने औरंगाबाद येथे कारखाना उभारण्यासाठी आवश्यक असलेली बहुतांश रक्कम वितरित केली आहे. आतापर्यंत 150 कोटीं खर्च केलेत. अशा परिस्थितीत औरंगाबादेतून माघारी जाणे परवडणारे नसले, तरी भविष्यातील धोके पाहता माघार घ्यावी की काय असा विचार सध्या हमदर्दचं संचालक मंडळ करत आहे.
औद्योगिक वसाहतीमधील गुंडगिरीला कंटाळून आपल्या राज्यातील मोठमोठे उद्योग शेजारच्या राज्यात जाण्याचा विचार करत आहेत. अशातच राज्यात मोठी गुंतवणूक करण्यासाठी आलेल्या हमदर्द कंपनीसारख्या कंपन्या स्थानिकांसाठी किमान 500 जणांना रोजगार उपलब्ध करुन देऊ शकते. शहरात होणार्या दंगली, उद्योगांवर होणारे हल्ले आणि पाण्याची कमतरता यामुळे उद्योजक औरंगाबादेत यायला तयार नाहीत. त्यातच अशाप्रकारे गुंडगिरी वाढत गेली तर आहे त्यात कंपन्यादेखील शहर सोडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याचा फटका औरंगाबादकरांना बसेल, यात शंका नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
