एक्स्प्लोर
गोंदियात सख्ख्या भावंडांचा मृत्यू, गोधडीखाली श्वास गुदमरल्याची शक्यता
मोठ्या मुलाच्या तोंडातून फेस निघत असल्याने विषबाधा झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
गोंदिया : गोंदियात दोन चिमुरड्या भावंडांचा गोधडीखाली गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अडीच वर्षीय डेव्हिड आणि नऊ महिन्यांच्या चहल पुंडे यांनी प्राण गमावले.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात धोबीटोला गावात हा प्रकार घडला. अंगावर जड पांघरुण घेतल्यामुळे श्वास कोंडल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. मात्र मोठ्या मुलाच्या तोंडातून फेस निघत असल्याने विषबाधा झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास आई प्रिती यांनी चिमुरड्यांना दूध पाजून झोपवलं. पुन्हा औषध देण्यासाठी त्यांना उठवायला गेली असताना त्यांचा मृत्यू झाल्याचं तिच्या लक्षात आलं.
जेवणानंतर मुलांना दूध पाजून झोपवल्यामुळे दुधातून विषबाधा झाली नाही ना, या दिशेने पोलिस तपास करत आहेत. दुधाची बाटली, उर्वरित दूध आणि मुलांनी घातलेले गरम कपडे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर या चिमुरड्यांच्या मृत्यूच खरं कारण समोर येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement