एक्स्प्लोर
गोकुळचं गायीचं दूध दोन रुपयांनी महागलं
गोकुळच्या गायीच्या दुधाच्या विक्रीदरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. उद्या 1 ऑगस्टपासून गोकुळचे नवे दर लागू होतील. फक्त गायीच्या दुधाच्या विक्रीदरात वाढ केली जाणार आहे. म्हशीच्या दुधाच्या दरात कोणताही बदल होणार नाही.
कोल्हापूर : गोकुळच्या गायीच्या दुधाच्या विक्रीदरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. उद्या 1 ऑगस्टपासून गोकुळचे नवे दर लागू होतील. फक्त गायीच्या दुधाच्या विक्रीदरात वाढ केली जाणार आहे. म्हशीच्या दुधाच्या दरात कोणताही बदल होणार नाही.
कोल्हापूरमधील गोकुळ दूधसंघानं गायीच्या दुधाच्या विक्रीदरात वाढ केली आहे. त्यामुळे उद्यापासून गोकुळ गायीच्या दुधासाठी ग्राहकांना 2 रुपये जास्त मोजावे लागतील. कोल्हापूरमध्ये सध्या गायीचं दूध 38 रुपये प्रतिलीटर विकलं जातं. उद्यापासून त्याचा विक्रीदर 40 रुपये होणार आहे.
मुंबईतही या दुधाच्या दरवाढीचा फटका बसणार आहे. मुंबईत गोकुळचं टोन्ड दूध सध्या 40 रुपयांना विकलं जातं. ते उद्यापासून 40 रुपयांना विकलं जाईल. तसंच गोकुळ लाईफ दूध सध्या 42 रुपयांना विकलं जातं, ते 44 रुपयांना विकलं जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement