सावधान! गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, नांदेडमध्ये पुराचं पाणी नागरिकांच्या घरात, बोटीद्वारे रेस्क्यू सुरु
. गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गोदावरी नदीचे पाणी नांदेड शहरातील नागरिकांच्या घरात शिरण्यास सुरुवात झाली आहे.
Godavari River Nanded : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. त्यामुळं जनजीवन विस्कळी तझालं आहे. अशीच परिस्थिती नांदेड जिल्ह्यात देखील झाली आहे. गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गोदावरी नदीचे पाणी नांदेड शहरातील नागरिकांच्या घरात शिरण्यास सुरुवात झाली आहे. वसरणी भागातील पंचवटी नगरात गोदावरी नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे.
अनेक कुटुंबांना बोटीद्वारे केलं रेस्क्यू
नांदेड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक कुटुंबांना बोटीद्वारे रेस्क्यू केले आहे. विष्णुपुरी धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आल्याने पूर परिस्थिती कायम आहे. विष्णुपुरी धरणातून तब्बल एक लाख 62 हजार क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळं नगारिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिकमध्येही मुसलधार पाऊस, वाघाडी नाल्याचे पाणी थेट गोदावरी घाट परिसरात
नाशिकच्या म्हसरुळ आरटीओ ऑफीस परिसरात झालेल्या मुसळधार पावसानं वाघाडी नाला ओसंडून वाहत होता. पाण्याचा अंदाज न आल्यानं वाघाडी नाल्याचे पाणी थेट गोदावरी घाट परिसरात आले. नाल्याला पूर आल्यानं गोदा घाट परिसरात भरणाऱ्या आठवडे बाजारातील विक्रेत्यांचे नुकसान झाले आहे. काही विक्रेत्यांचे भाजीपाला, धान्य वाहून गेले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाघाडीचे पाणी गोदा घाट परिसरात आल्यानं अग्निशमन दल आणि मनपाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. नाशिकमध्ये रात्री साडेआठ वाजेपर्यंत 15 मिलिमीटर पाऊस झाला, मात्र शहाराच्या इतर भागात पावसाचा शिडकाव झाला आणि पंचवटी, म्हसरूळ भागात धुवांधार पाऊस झाल्यान नागरिकांची तारम्बल तर प्रशासनाची धावपळ उडाली.
लातूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस
महत्वाच्या बातम्या:
























