एक्स्प्लोर
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांमधला डॉक्टर पुन्हा दिसला, ताफा थांबवून जखमी तरुणाला मदत
मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून अपघातग्रस्त दुचाकी चालकाची आस्थेने चौकशी केली.
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पेशाने डॉक्टर आहेत. मुख्यमंत्री म्हणून कामात व्यस्त असताना आपला वैद्यकीय पेशा सांभाळू शकले नाही तर त्यांनी आपल्यातील डॉक्टर अजूनही जिवंत ठेवला आहे. आज खांडेपार येथे एका अपघातग्रस्त दुचाकी चालकाला मुख्यमंत्र्यांनी तातडीने उपचार मिळावेत यासाठी तातडीने रुग्णवाहिका मागवून त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची देखील व्यवस्था केली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत संजीवनी सहकारी साखर कारखान्या संदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी जात, असताना खांडेपार पूलावर एक दुचाकी चालक अपघातग्रस्त होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून अपघातग्रस्त दुचाकी चालकाची आस्थेने चौकशी केली. त्यानंतर अपघातग्रस्त दुचाकी चालकाला तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिका मागवून त्यातून त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यापूर्वी देखील दोन वेळा रस्त्यात अपघातग्रस्त चालकांना मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवून आवश्यक ती मदत उपलब्ध करुन दिली होती. त्यांच्या या कृतीचे सगळीकडून स्वागत केले जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement