एक्स्प्लोर
एबीपी माझाचे प्रतिनिधी सागर वैद्य यांचा ‘गिरणा गौरव’ने सन्मान

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील सन्मानाचा समजला जाणारा ‘गिरणा गौरव’ पुरस्कार यंदा एबीपी माझाचे नाशिकचे प्रतिनिधी सागर वैद्य यांना प्रदान करण्यात आला. बुधवारी कालिदास कलामंदिरात जेष्ठ कवी फ. मु. शिंदे, माध्यमतज्ञ समीरण वाळवेकर, विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
मानपत्र, स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराच स्वरुप आहे. सागर वैद्य यांच्यासह अभिनेत्री मृणाल दुसानीस, ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा रोवणारा रोईंगपटू दत्तू भोकनळ, उद्योजक किरण चव्हाण, कांदा निर्यातदार खंडू देवरे, पोलीस निरिक्षक सीताराम कोल्हे, पर्यावरणप्रेमी हैदरअली नुराणी आदींना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या योगदानासाठी गिरणा गौरवने सन्मानित करण्यात आलं.
यंदा या पुरस्काराचं 17 वं वर्ष होतं. यावेळी फ. मु. शिंदेंनी खुमासदार शैलीत राजकीय सामाजिक सद्यस्थिती भाष्य केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
