एक्स्प्लोर
कल्याणमध्ये डंपरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

कल्याण : रस्त्यांवरचे खड्डे आणि बेकायदेशीर वाहतुकीमुळे कल्याणमध्ये एका तरुणीला जीव गमवावा लागला आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणीच्या स्कूटीला डंपरने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हाजी मलंगगड रोडवर शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. प्राजक्ता फुलोरे असं या तरुणीचं नाव असून पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे. कल्याण पूर्व मध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेला हा दुसरा अपघात आहे. यापूर्वीही एका शाळकरी मुलीला जीव गमवावा लागला होता. तसंच या रस्त्यावरून अवजड वाहनांची बेकायदेशीर वाहतूक होते, ज्यामुळे अपघात होतात आणि त्यात सामान्यांचा बळी जातो. दरम्यान, रस्ता दुरुस्तीसाठी केलेल्या मागणीकडे आयुक्तांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























