एक्स्प्लोर
लातूरमध्ये फेसबुक लाईव्ह करत तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
तरुणीने रात्री दोनच्या सुमारास फेसबुक लाईव्हवर गुडनाईट लिक्विड पिऊन आत्महत्या करत असल्याचं सांगत होती.

लातूर : फेसबुक लाईव्ह करत तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार लातूरच्या औसा रोड परिसरात घडला आहे. तरुणीने गुडनाईटचे लिक्विड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तरुणीने रात्री दोनच्या सुमारास फेसबुक लाईव्हवर गुडनाईट लिक्विड पिऊन आत्महत्या करत असल्याचं सांगत होती. हा प्रकार पोलिसांना कळताच त्यांनी तरुणीचं घर गाठलं. मात्र त्याआधीच लिक्विड प्यायल्याने पोलिसांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असून स्थिर आहे. ही तरुणी पँथर सेनेची पदाधिकारी होती. मात्र राजीनामा दिल्यानंतरही काही लोक त्रास देत होते. यामुळे चिडून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रयत्न केला. ही बातमी पसरताच फेसबुकवरुन लिंक हटवण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
आरोग्य
निवडणूक























